Advertisement

खातेवाटपावरून चव्हाण, पवार यांच्यात खडाजंगी?

महाविकास आघाडी सरकारमधील खातेवाटपाचा तिढा अजून सुटण्याची चिन्हे नाहीत. गुरूवारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तब्बल ४ तास चर्चाा झाली या चर्चेतूनही काही तोडगा निघू शकला नाही.

खातेवाटपावरून चव्हाण, पवार यांच्यात खडाजंगी?
SHARES

महाविकास आघाडी सरकारमधील खातेवाटपाचा तिढा अजून सुटण्याची चिन्हे नाहीत. गुरूवारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तब्बल ४ तास चर्चाा झाली या चर्चेतूनही काही तोडगा निघू शकला नाही. उलट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यात या बैठकीमध्ये शाब्दीक चकमक उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी झाला. परंतु खातेवाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये खेचाखेची सुरूच असल्याने हे खातेवाटप रखडलं आहे. यावर चर्चा करण्यासाठी गुरूवारी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कुठल्या पक्षाला कुठलं खातं बदलून देता येईल, यावर ४ तास चर्चा झाली. परंतु या बैठकीत अंतिम तोडगा निघू शकला नाही. 

हेही वाचा- खडसे, फडणवीस यांच्यात दिलजमाई?

ग्रामीण भागाशी संबंधित एखादं खातं मिळावं खासकरून कृषीखातं, असा काँग्रेस पक्षनेतृत्वाचा आग्रह असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी ताठर भूमिका घेतली आहे. शिवसेना राष्ट्रवादीसाठी गृहखातं सोडू शकते, तर एखादं खातं आमच्यासाठी का सोडू शकत नाही, असा काँग्रेसचा सवाल आहे. खातेवाटपात राष्ट्रवादी हवी तशी खाती मिळवत असताना काँग्रेसचे नेते गप्प का होते? महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला काय फायदा होईल? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केल्याने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे हे नेते माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत. 

या चर्चेत अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विषय काढल्यावर ते मंत्रिमंडळात नसताना त्यांचा इथं संबंध काय असा प्रश्न विचारला. त्यावर आधी तुमचा नेता ठरवा, मग बोलू असं पवार यांनी म्हटल्यावर चव्हाण तिथून निघून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचा- खडसेंचे आरोप निराधार- गिरीश महाजन

तर, बहुतांश खात्यांबाबत मतैक्य झालं असून कुठल्या पक्षाचं काय म्हणणं आहे, यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे खातेवाटपाचा अंतिम निर्णय तेच  घेतील, असं अजित पवार यांनी सांगितलं.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा