Advertisement

खडसे, फडणवीस यांच्यात दिलजमाई?

वेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या तीव्र विरोधामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असा थेट आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यात शुक्रवारी भेट झाली.

खडसे, फडणवीस यांच्यात दिलजमाई?
SHARES

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या तीव्र विरोधामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असा थेट आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यात शुक्रवारी भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचं म्हटलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीत खडसे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पक्षाने मुक्ताईनगरमधून तिकीट दिलं असलं, तरी या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पक्षातील विरोधकांनी जाणीवपूर्वक हा पराभव घडवून आणल्याचा आरोप खडसे यांच्याकडून सातत्याने करण्यात आला. 

हेही वाचा- खडसेंचे आरोप निराधार- गिरीश महाजन

या सर्व गोष्टीला जबाबदार असलेल्या वरिष्ठ नेतृत्वावर कारवाई करण्याची मागणीही खडसेंनी केली. परंतु पक्षाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या खडसे यांनी अखेर फडणवीस आणि महाजन यांनी आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा डाव आखल्याचा जाहीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. 

यावर प्रतिक्रिया देताना महाजन यांनी खडसेंचे आरोप फेटाळून लावले असले, तरी फडणवीस यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. याच पार्श्वभूमीवर खडसे आणि फडणवीस यांच्यात शुक्रवारी अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत जळगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. माझ्या नाराजीबाबत कुठलीही चर्चा दोघांमध्ये झाली नाही, असं खडसेंनी सांगितलं.

या भेटीबाबत भाजपात सारं काही आलबेल असल्याची प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.   

हेही वाचा- अटी बघूनच भूक मरेल, शिवभोजन योजनेवर नीलेश राणेंची टीका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा