अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या वकिलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

अँड सातपुते यांनी धमकावल होत.त्याची तक्रार सदर महिलेने माहीम पोलीस स्टेशन आणि राज्य महिला आयोगाकडे केली होती.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या वकिलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
SHARES

बहुचर्चित अभिनेत्री तनुश्री दत्ता हिला विनयभंगाच्या गुन्ह्यात न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे वकिल नितीन सातपुते यांच्या विरोधातच एका महिलेने खेरवाडी पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा नोंदवला आहे. सातपुते आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत रहात असून सातपुते यांनी घराजवळ बनवलेल्या गार्डनवरून त्यांच्यात वाद सुरू होता. यातून सातपुते यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

माहिमच्या गोपी टँक रोडवरील एका इमारतीत पीडित महिला या रहात असून त्याच इमारतीच्या तळ मजल्यावर अँड नितीन सातपुते राहतात. नितीन सातपुते यांनी इमारत परिसरात घराला लागून एक गार्डन बनवलं आहे.त्यावर सप्टेंबर २०१९ मध्ये सोसायटीच्या मिटिंगमध्ये महिलेने आक्षेप घेतला होता. त्यावरून दोघात वाद सुरू होता. याबाबत आपल्याला अँड सातपुते यांनी धमकावल होत.त्याची तक्रार सदर महिलेने माहीम पोलीस स्टेशन आणि राज्य महिला आयोगाकडे केली होती.त्यावर ३० डिसेंम्बर २०१९ रोजी सुनावणी होती. त्यावेळी महिला आयोगाच्या कार्यालयात आपल्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं अँड सातपुते यांनी बोलल्याच तक्रारदार महिलेचं म्हणणं होतं. तिने केलेल्या तक्रारीवरून २ जानेवारी २०२० रोजी खेरवाडी पोलीस ठाण्यात ३५४ - अ(१)(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- सायबर सुरक्षेबाबत महिला व विद्यार्थींनी जागरूक रहावे- मुख्यमंत्री

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा