Advertisement

अक्षय बांधणार पोलिसांसाठी रुग्णालय


अक्षय बांधणार पोलिसांसाठी रुग्णालय
SHARES

नायगाव - सामाजिक कार्यात नेहमीच धावून येणारा अभिनेता अक्षय कुमार आता पोलिसांना मदतीचा हात देणार आहे. मुंबईच्या नायगावमध्ये पोलीस आणि त्यांच्या मुलांसाठी रुग्णालय बांधण्याचा निर्णय त्याने घेतलाय.

मुंबई पोलिसांसाठी आयोजित केलेल्या 'उमंग 2017' या कार्यक्रमात अक्षयही उपस्थित होता. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती होती. याच दरम्यान अक्षयने पोलिसांसाठी रुग्णालय बांधण्याचं कारण ही सांगितलं. तो म्हणाला की त्याचे वडील ओम भाटीया हे कन्सरग्रस्त होते. तेव्हा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्यावेळी तिथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी जागाच नव्हती. रुग्णालयाची ती स्थिती पाहून अगदी कासावीस झाल्याचं त्याने सांगितलं. तेव्हा आपण नवीन रुग्णालया बांधण्याचा निर्णय घेतल्याचं अक्षयने सांगितलं. अक्षय म्हणाला की पोलीस आणि त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची चांगली सोय व्हावी म्हणून नायगावमध्ये रुग्णालय बांधलं जाणार आहे. पोलीस देशासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असंही अक्षय म्हणाला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा