Advertisement

ईशान-अनन्याचा 'खाली पिली'चा खेळ सुरू

'धडक' या सिनेमानंतर अभिनेता ईशान खट्टर सध्या 'खाली पिली' या आपल्या आगामी हिंदी सिनेमाच्या कामात बिझी आहे. या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच सुरू करण्यात आलं आहे.

ईशान-अनन्याचा 'खाली पिली'चा खेळ सुरू
SHARES

'धडक' या सिनेमानंतर अभिनेता ईशान खट्टर सध्या 'खाली पिली' या आपल्या आगामी हिंदी सिनेमाच्या कामात बिझी आहे. या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच सुरू करण्यात आलं आहे.



टपोरी शीर्षक

'सैराट' या गाजलेल्या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक'मध्ये जान्हवी कपूरसोबत जोडी जमवलेला ईशान आता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेसोबत आॅनस्क्रीन रोमांस करताना दिसणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. 'खाली पिली' असं काहीसं टपोरी शीर्षक असलेल्या या सिनेमाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेल्या या सिनेमाच्या फर्स्ट लुक पोस्टरमध्ये ईशान आणि अनन्या ही गोंडस जोडी पहायला मिळते. 


पुढल्या वर्षी प्रदर्शित

झी स्टुडिओज आणि अली अब्बास झफर यांची निर्मिती असलेल्या 'खाली पिली' या चित्रपटाचा क्लॅपबोर्ड सोशल मीडियावर शेअर करून शूट सुरू झाल्याचे संकेत देण्यात आले आहेत. 'सुलतान', 'टायगर झिंदा है' आणि 'भारत' या चित्रपटांच्या यशानंतर 'खाली पिली'च्या निर्मितीच्या निमित्तानं झी टॅाकिज आणि अली अब्बास झफर हे कॅाम्बिनेशन पुन्हा एकत्र आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मकबूल खान करणार असून, पुढल्या वर्षी १२ जून रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.


भूमिकांचं कौतुक

ईशान आणि अनन्या या दोघांसाठीही हा सिनेमा अतिशय महत्त्वाचा ठरणार असल्याचं बोललं जात आहे. 'बिआँड द क्लाऊड' आणि 'धडक' या सिनेमांमध्ये ईशाननं साकारलेल्या भूमिकांचं सर्वच स्तरांमधून कौतुक झालं होतं. त्यामुळं या सिनेमातही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. या जोडीला 'स्टुडंट आॅफ द ईयर २'द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अनन्यानंही कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सर्वांचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. हे सर्व पाहता 'खाली पिली' या सिनेमात ईशान आणि अनन्या या दोघांसोबतच त्यांच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीवरही सर्वांचं लक्ष असेल हे विसरता येणार नाही.



हेही वाचा -

सायली-शिवानी बनल्या सलमानच्या नायिका!

मुरुगादॅास भरवणार रजनीचा 'दरबार'!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा