Advertisement

भल्लाल देवची मृत्यूवर मात, अनुभव सांगताना अश्रू अनावर

बाहुबली या चित्रपटामुळे राणा चर्चेत आला. पण सध्या तो चर्चेत आला आहे ते त्याच्या आजारामुळे.

भल्लाल देवची मृत्यूवर मात, अनुभव सांगताना अश्रू अनावर
SHARES

अभिनेता राणा दग्गुबातीनं (Rana Daggubati) बाहुबली (Bahubali)' या ब्लॉकबस्टर सिनेमामध्ये जबदरस्त अभिनय केला. त्याच्या अभिनयानं सर्वांनाच भुरळ पाडली. बाहुबलीच्या अर्थात प्रभासच्या (Prabhas) तोडीस तोड अभिनय राणानं केला होता. बाहुबली या चित्रपटामुळे राणा चर्चेत आला. पण सध्या तो चर्चेत आला आहे ते त्याच्या आजारामुळे.

घाबरू नका. सध्या त्याला कुठला आजार नाही आहे. तर समंथा अक्किनेकीच्या शोमध्ये राणानं त्याच्या जुन्या आजारपणाबाबत माहिती दिली. या टॉक शोचा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे.

राणानं सांगितलं की, ‘आयुष्य एकदम मस्त सुरू असताना एक जोरदार ब्रेक लागला. तो माझ्या आजारपणामुळे. मला आधीपासूनच बीपीचा त्रास होता. हृदयाच्या चारही बाजूंना कॅल्सिफिकेशन होतं. किडनी फेल झाली होती. हॅमरेजची शक्यता ७० टक्के होती. कदाचित जीवही गेला असता.’ राणा हे सांगताना स्वत: भावूक झाला होता.

राणा दग्गुबाती लवकरच 'हाथी मेरे साथी' या सिनेमामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा अनेक भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सिनेमात मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकरही दिसणार आहे. राणानं नुकतंच लग्न केलं आहे. त्याच्या हनीमूनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.हेही वाचा

३० वर्ष मनोरंजन केल्यानंतर अंडरटेकरची WWE मधून निवृत्ती

कॉमेडिअन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्षला कोर्टाकडून जामीन मंजूर

संबंधित विषय
Advertisement