Advertisement

कॉमेडिअन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्षला कोर्टाकडून जामीन मंजूर

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

कॉमेडिअन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्षला कोर्टाकडून जामीन मंजूर
SHARES

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना थोडा दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी न्यायालयानं दोघांचा जामीन मंजूर केला आहे. २३ नोव्हेंबरला जामीन याचिकेवर सुनावणी झाली.

अंमली पदार्थ विरोधी पथकानं भारती सिंगच्या घरावर शनिवारी छापा टाकला होता. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीनं शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष यांनी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती.

त्यानंतर एनसीबीने एनडीपीएस कायदा १९८५, कलम २० अ, २० ब २ आणि २७ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती. या दोघांनाही मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयानं १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली होती. भारती आणि हर्षनं जामीनासाठी अर्ज केला होता, त्यावर सोमवारी सुनावणी झाली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. एनसीबीनं शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला होता. कारवाईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती.

त्याच्याकडून १५ एलएसडी डॉट्स, ४० ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अंमली पदार्थ एनसीबीनं हस्तगत केलं होतं. त्याच्या चौकशीतून भारती आणि तिच्या नवऱ्याचं नाव समोर आलं होतं.हेही वाचा

कपिल शर्मा पुन्हा होणार बाबा, २०२१ मध्ये गिन्नी देणार बाळाला जन्म

अक्षय कुमारनं युट्यूबर विरोधात दाखल केला ५०० कोटींचा दावा

संबंधित विषय
Advertisement