Advertisement

अक्षय कुमारनं युट्यूबर विरोधात दाखल केला ५०० कोटींचा दावा

अभिनेता अक्षय कुमारनं एका युट्यूबरवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

अक्षय कुमारनं युट्यूबर विरोधात दाखल केला ५०० कोटींचा दावा
SHARES

अभिनेता अक्षय कुमारनं एका युट्यूबरवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. राशिद सिद्दीकी नावाच्या युट्यूबरनं आपल्या चॅनेलवर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधी फेक न्यूज पोस्ट केली होती.

तसंच, अक्षय कुमारवर रिया चक्रवर्तीला कॅनडाला पळून जाण्यास मदत केल्याचे आरोप लावले होते. यासोबतच त्यानं दावा केला होता की, सुशांत प्रकरणी अक्षय कुमार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.

मिड डेच्या रिपोर्टनुसार, सिद्दीकीने दावा केला होता की, अक्षय कुमार सुशांत सिंह राजपूतला ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपट मिळाल्यापासून नाराज होता. या रिपोर्टमध्ये हा दावाही केला आहे की, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंबंधी कंटेंट आपल्या चॅनेलवर पोस्ट करून युट्यूबरनं चार महीन्यात १५ लाख रुपयांची कमाई केली. २५ वर्षीय राशिद बिहारचा रहिवासी असून, तो युट्यूबवर FF न्यूज नावाचं चॅनेल चालवतो.

मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार विरोधात सिद्दीकीच्या खोट्या बातम्यांना YouTubers वर लाखो व्हिव्ह मिळाले आहेत. तसंच, तपासात समोर आलं की, YouTube वर सुशांतच्या मृत्यू संबंधी बातम्या टाकून सिद्दीकीनं ६.५ लाख रुपयांचा कमाई केली.

यापूर्वी मुंबई सायबर पोलिसांनी दिल्लीचे वकील विभोर आनंदला अटक केली होती. आनंदवर सुशांतच्या मृत्यू संबंधी फेक न्यूज पोस्ट करणं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत अपशब्द वापरण्याचा आरोप आहे. आनंदनंही या व्हिडिओतून हजारो सबस्क्रायबर मिळवले होते. सिद्दीकीकडे सुशांतच्या मृत्यूपूर्वी दोन लाख सबस्क्राइब होते, नंतर ते वाढून ३.७० लाख झाले.



हेही वाचा

कंगना आणि रंगोलीला मुंबई पोलिसांचं तिसऱ्यांदा समन्स

गायी-म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोकं सहन करतील, पण...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा