Advertisement

कंगना आणि रंगोलीला मुंबई पोलिसांचं तिसऱ्यांदा समन्स

या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात समन्स बजावून पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचे सांगत दोघी चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या.

कंगना आणि रंगोलीला मुंबई पोलिसांचं तिसऱ्यांदा समन्स
SHARES
अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोली चंडेलला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावलं आहे. सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी कंगना आणि रंगोलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या चौकशीसाठी आतापर्यंत मुंबई पोलिसांनी दोन समन्स पाठवले होते. मात्र, त्या हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे बुधवारी पुन्हा तिसरं समन्स बजावण्यात आलं आहे. दोघींना २३-२४ नोव्हेंबर रोजी बांद्रा पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टाच्या आदेशानंतर या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासाठी पोलिसांनी बुधवारी या दोघींना समन्स बजावून याबाबत सूचना दिली. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरोधात समन्स बजावून पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, आपल्या भावाच्या लग्नकार्यात व्यस्त असल्याचे सांगत दोघी चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या.दोघींविरोधात मुनव्वरली साहिल ए. सय्यद यांनी भादंवि १२४ अ नुसार देशद्रोहाची तक्रार दाखल केली होती. सय्यद हे बॉलिवूडमधील कास्टिग डिरेक्टर आणि फिटनेस ट्रेनर आहेत. कंगना आणि तिची बहिण रंगोली या चित्रपटसृष्टीची बदनामी करीत असल्याचा त्यांनी आरोप केला होता.

हेही वाचा -

काशीमिरात ४ वर्षांच्या मुलीचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा