Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

३० वर्ष मनोरंजन केल्यानंतर अंडरटेकरची WWE मधून निवृत्ती

अमेरिकन रेसलर आणि WWE सुपरस्टार द अंडरटेकरनं रविवारी निवृत्ती घेण्याची घोषणा केली.

३० वर्ष मनोरंजन केल्यानंतर अंडरटेकरची WWE मधून निवृत्ती
SHARES

अमेरिकन रेसलर आणि WWE सुपरस्टार द अंडरटेकरनं रविवारी निवृत्ती घेण्याची घोषणा केली. अंडरटेकर रविवारी वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट (WWE) सरवायवर सीरीज २०२० दरम्यान शेवटचा रिंगमध्ये दिसला. यावेळी त्यांनी आपल्या फेमस वॉकसह रिंगमध्ये एंट्री घेतली. २२ नोव्हेंबर १०९० ला डेब्यू करणाऱ्या अंडरटेकरनं २२ नोव्हेंबर २०२० ला WWE ला निरोप दिला.

WWE नं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे अंडरटेकरनं एक पोस्ट केली. यात लिहलं आहे की, रिंगमधील माझी वेळ संपली आहे. आता अंडरटेकरला निरोप द्या. यादरम्यान WWE लीजेंड द रॉक, जॉन सीना, ट्रिपल एच, शॉन मायकल्स, रिक फ्लेअर आणि केनसह अनेक सुपरस्टार उपस्थित होते. यावेळी सर्वांनी अंडरटेकरचे ३० वर्षांच्या करिअरसाठी आभार मानले.

अंडरटेकरनं २२ नोव्हेंबर १९९० ला सरवायवर सीरीजद्वारे WWE मध्ये पदार्पण केले होते. अंडरटेकरने ७ वेळा WWE चॅम्पियनशिप आपल्या नावे केली आहे. आगळ्या-वेगळ्या रिंग वॉकद्वारे अंडरटेकरला ओळख मिळाली होती. ५५ वर्षीय अंडरटेकरनं WWE मध्ये आपला अखेरचा सामना रेसलमेनिया ३६ मध्ये AJ स्टाइल्सविरोधात खेळला होता. या सामन्यात अंडरटेकरला विजय मिळाला होता.हेही वाचा

एफआयआर रद्द करण्यासाठी कंगनाची मुंबई हायकोर्टात धाव

कॉमेडिअन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्षला कोर्टाकडून जामीन मंजूर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा