Advertisement

संजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'

मसालेदार आणि कॅामेडी चित्रपटांसोबतच वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणारे संजय मिश्रा आता 'बहुत हुआ सम्मान' असं म्हणत आहेत. हेच त्यांच्या आगामी चित्रपटाचं टायटल आहे.

संजय मिश्रा म्हणतात 'बहुत हुआ सम्मान'
SHARES

मसालेदार आणि कॅामेडी चित्रपटांसोबतच वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणारे संजय मिश्रा आता 'बहुत हुआ सम्मान' असं म्हणत आहेत. हेच त्यांच्या आगामी चित्रपटाचं टायटल आहे.


विनोदी भूमिका

दिग्दर्शक केतन मेहतांच्या 'ओ डार्लिंग! ये है इंडीया' या चित्रपटात हार्मोनियम वाजवणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत बॅालीवूडमध्ये दाखल झालेल्या संजय मिश्रांनी साकारलेल्या बऱ्याच विनोदी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात केवळ विनोदी भूमिका साकारणाऱ्या मिश्रांनी सटायर सिनेमांमध्ये साकारलेल्या धीरगंभीर भूमिकांनीही प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जबरीया जोडी' या चित्रपटात त्यांनी नायिकेच्या वडीलांची भूमिकाही यशस्वीपणे साकारली आहे. अशा प्रकारे विविधांगी व्यक्तिरेखांना न्याय देण्याचं कसब अंगी असलेलले मिश्रा आता 'बहुत हुआ सम्मान' असं म्हणत आहेत. 


शूटिंग सुरू

खरं तर 'बहुत हुआ सम्मान' हे मिश्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या आगामी हिंदी चित्रपटाचं टायटल आहे. या चित्रपटात त्यांच्या जोडीला राम कपूर, स्वानंद किरकिरे, राखव जुयाल, नमिता दास, फ्लोरा सैनी अशी स्टारकास्ट आहे. या जोडीला अभिषेक चौहान हा नवा चेहरा या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल होणार आहे. या विनोदी चित्रपटाचं शूटिंग नुकतंच मुंबईत सुरू झालं आहे. यॅाडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आशिष शुक्ला करत आहेत. शीर्षकावरून तरी हा सिनेमा एखाद्या मुद्द्यावर भाष्य करणारा असल्याचं वाटतं. शीर्षक नेमकं काय सांगत आहे ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.हेही वाचा -

ऋतिक-टागयरमध्ये होणार 'वॅार'

'तेजाज्ञा'ची सणासुदीसाठी खास भेट

आता बस्स… बस्स…
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा