Advertisement

'तेजाज्ञा'ची सणासुदीसाठी खास भेट

श्रावण महिना सुरू होताच हिंदू सणांची रेलचेल सुरू होते. याचंच औचित्य साधत अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे आपल्या चाहत्यांसाठी एक मराठमोठी खास भेट घेऊन आल्या आहेत.

'तेजाज्ञा'ची सणासुदीसाठी खास भेट
SHARES

श्रावण महिना सुरू होताच हिंदू सणांची रेलचेल सुरू होते. याचंच औचित्य साधत अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि अभिज्ञा भावे आपल्या चाहत्यांसाठी एक मराठमोठी खास भेट घेऊन आल्या आहेत.

तेजस्विनी आणि अभिज्ञा आपल्या तेजाज्ञा फॅशन ब्रॅन्डव्दारे सातत्यानं नाविन्यपूर्ण कलेक्शन्स आणत असतात. डेनिम कलेक्शन, नथ दुप्पट्टा कलेक्शन, सिल्व्हर ज्वेलरी कलेक्शन अशा वेगवेगळ्या कलेक्शन्सनंतर आता तेजाज्ञा 'दागिना कलेक्शन' घेऊन आल्या आहेत. हे कलेक्शन खास सणासुदीचा मोसम लक्षात घेऊन लाँच करण्यात आलं आहे. या दागिना कलेक्शव्दारे पहिल्यांदाच साडीला दागिन्याचे अनोखे डिझाइन असण्याचा एक्सपिरीमेन्ट करण्यात आला आहे. साडीच्या पुढील बाजूवर गळ्याजवळ आणि ब्लाउजवर दागिन्याचे डिझाइन असलेल्या साड्यांचं कलेक्शन लाँच झालं आहे. आपल्या डिझाइनर वेअरमधून पारंपरिकतेला आधुनिकेतेची जोड देण्याचा प्रयत्न करणा-या तेजस्विनी पंडितला ही आगळी कल्पना सुचली.

या नवीन कलेक्शनविषयी अधिक माहिती देताना तेजस्विनी म्हणाली की, सण-समारंभावेळी तयार होताना दरवेळी प्रत्येकीला पडणारा कॉमन प्रश्न असतो, तो म्हणजे आता साडीवर कोणते दागिने घालू? हा प्रश्न सोडवण्याच्या कल्पनेतून या कलेक्शनचा जन्म झाला आहे. आपल्याकडे नेहमीच साडीचा पदर भरजरी असावा किंवा त्यावर जास्तीत जास्त काम असावं, याकडे लक्ष दिलं जातं. पण आता जमाना सेल्फीचा आहे. त्यामुळं आजकाल स्त्रिया साडीच्या पल्लुपेक्षाही अधिक गळ्याविषयीचा विचार करतात, हे माझ्या लक्षात आलं. म्हणूनच पहिल्यांदा मी साडीच्या समोर येणाऱ्या बाजूवर जास्त काम सुरू केलं. 

तेजाज्ञाच्या डिझाइनर कलेक्शनमध्ये साडीसोबतच नेहमी ब्लाउजचाही विचार होतो. तसे डिझाइनर ब्लाउजही साडीसोबतच दिले जातात. याबाबत तेजस्विनी म्हणाली की, एका क्षणी माझ्या असं लक्षात आलं की, हे पुरेसं नाही आहे. साडी नेसतानाच ब्लाउजचा गळा कसा असावा यासोबतच गळ्यात काय घालायला हवं, याचाही विचार करावा लागणार. त्यातूनच ही कल्पना सुचली. तेजाज्ञाच्याच भाग असलेल्या सुनीता कुलकर्णी यांनी ही कल्पना सत्यात उतरवायला मला मदत केली. त्यांनी दागिन्यांची हुबेहुब दिसणारी डिझाइन येईल यावर काम केलं. हे डिझाइन मी काही जवळच्या मैत्रिणींना अभिप्रायासाठी दाखवलं. त्यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रियांवरून हे इतर स्त्रियांनाही आवडेल, हा विश्वास वाटल्यानं हे कलेक्शन घेऊन आलो आहोत.

तेजाज्ञाच्या निमित्तानं अभिनयाकडून कपड्यांच्या ब्रँडकडे वळली अभिज्ञा भावे या नवीन कलेक्शनविषयी म्हणाली की, पुतळी हार, कोल्हापूरी साज, तन्मणी, शिवमुद्रा आणि पैठणीचे मुलभूत डिझाइन या डिझाइन्समध्ये सध्या हे कलेक्शन उपलब्ध असेल. आता श्रावणापासून सण-समारंभाला सुरूवात होते. मंगळागौर, रक्षाबंधन, गणपती-गौरी, नवरात्री, दिवाळी आणि नंतर लग्नकार्य यामध्ये आता काहीतरी नवं आणि एक्स्क्लुजिव घालू असं प्रत्येकीलाच वाटतं. म्हणून मग हे कलेक्शन आम्ही लाँच करत आहोत.



हेही वाचा -

आता बस्स… बस्स…

जाॅनी मेरा नाम..!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा