ऋतिक-टागयरमध्ये होणार 'वॅार'

आजवर बऱ्याचदा चित्रपटसृष्टीतील दोन मोठे अभिनेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं सर्वांनीच पाहिलं असेल. आता ऋतिक रोशन वर्सेस टायगर श्रॅाफ ही लढाई प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

SHARE

आजवर बऱ्याचदा चित्रपटसृष्टीतील दोन मोठे अभिनेते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं सर्वांनीच पाहिलं असेल. आता ऋतिक रोशन वर्सेस टायगर श्रॅाफ ही लढाई प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


क्लॅश नाही

बऱ्याचदा काही सिनेमे क्लॅश होतात आणि त्यात मुख्य भूमिका साकारणारे कलाकार आमनेसामने उभे ठाकतात. आता ऋतिक रोशन आणि टायगर श्रॅाफ हे दोन अभिनेते जरी एकमेकांसमोर उभे ठाकणार असले, तरी त्यांचे सिनेमे क्लॅश होणार नसून, रसिकांना एकाच चित्रपटात हा सामना पहायला मिळणार आहे.  या सामन्याची तारीखही जाहिर झाली आहे. यंदा २ आॅक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी ऋतिक आणि टायगर यांच्यातील सामना प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


फर्स्ट लुक रिव्हील

'वॅार' असं शीर्षक असलेल्या आगामी चित्रपटाच्या निमित्तानं ऋतिक आणि टायगर प्रथमच एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच रिव्हील करण्यात आला आहे. हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटाची हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तिनही भाषेतील पोस्टर्स रिलीज करण्यात आली आहेत. हाती गन घेतलेले ऋतिक आणि टायगर या पोस्टरवर पहायला मिळतात. दोघांमध्ये नायिका आणि खाली महागड्या गाड्याही आहेत. त्यावरून या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा महागडा खेळ पहायला मिळणार यात शंका नाही.


वाणी कपूर मुख्य भूमिकेत 

'बेफिक्रे' या चित्रपटामध्ये हॅाट अँड बोल्ड रूपात दिसलेली वाणी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. दोन नायक आणि एक नायिका असल्यानं यात नेमकं काय पहायला मिळणार याबाबत उत्सुकता वाढते. अॅक्शन-थ्रीलर असलेल्या या चित्रपटात आशुतोष राणा, दिपान्नीता शर्मा, अनुप्रिया गोएंका आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. अगोदर या चित्रपटाचं टायटल 'फायटर्स' होतं, पण नंतर ते बदलून 'वॅार' असं ठेवण्यात आलं आहे. आदित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा आदित्य आणि सिद्धार्थ यांनी लिहिली आहे. पटकथा सिद्धार्थनं श्रीधर राघवन यांच्या साथीनं लिहिली असून, संवाद अब्बास टायरवाला यांचे आहेत.हेही वाचा -

'तेजाज्ञा'ची सणासुदीसाठी खास भेट

आता बस्स… बस्स…

जाॅनी मेरा नाम..!
संबंधित विषय
ताज्या बातम्या