Advertisement

विजय बनणार मुथैया मुरलीथरन

आजचा जमाना बायोपीकचा आहे. आज राजकारणी, समाजसेवक आणि खेळाडूंच्या जीवनावरही चित्रपट बनत आहेत. हीच परंपरा जोपासणाऱ्या आगामी चित्रपटात अभिनेता विजय सेथुपथी फिरकीपटू मुथैया मुरलीथरनच्या भूमिकेत दिसणार आहे.

विजय बनणार मुथैया मुरलीथरन
SHARES

आजचा जमाना बायोपीकचा आहे. आज राजकारणी, समाजसेवक आणि खेळाडूंच्या जीवनावरही चित्रपट बनत आहेत. हीच परंपरा जोपासणाऱ्या आगामी चित्रपटात अभिनेता विजय सेथुपथी फिरकीपटू मुथैया मुरलीथरनच्या (mutthaiya muralidharan) भूमिकेत दिसणार आहे.


श्रीलंकन क्रिकेटपटूंवरही बायोपीक

क्रिकेट (cricket) विश्वातील बरेच हिरो रुपेरी पडद्यावरही नायकाच्या रूपात झळकले आहेत. यात मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरसह (sachin tendulkar), भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (ms dhoni) आणि मोहम्मद अझरुद्दीन (mohhamad azaruddin) या भारतीय क्रिकेटपटूंच्या बायोपीकचा समावेश आहे. आता मात्र श्रीलंकन क्रिकेटपटूंवरही बायोपीक तयार होण्याची परंपरा सुरू होणार आहे. आपल्या फिरकीच्या बळावर मोठमोठ्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवणाऱ्या श्रीलंकन आफ स्पीनर मुथैया मुरलीथरनचा जीवनप्रवास आता चित्रपट रूपानं जगासमोर येणार आहे.


भावी पिढीसाठी प्रेरणादायी 

मुरलीथरननं आजवर क्रिकेटमधील बरेच विक्रम आपल्या नावे केले आहेत. त्यामुळं अनेक तरुण क्रिकेटर्सचं प्रेरणास्थान असलेल्या मुरलीथरनचं चित्रपटरूपात येणारं जीवनचरीत्र भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नसलं तरी मुरलीथरनची भूमिका दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेता, निर्माता, संवादलेखक, गीतकार अशी चौफेर कामगिरी करणारा विजय सेथुपथी करणार असल्याचं घोषित करण्यात आलं आहे.


डिसेंबरमध्ये शूटिंगचा शुभारंभ 

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तमिळ चित्रपटांमध्ये संवाद लेखनासोबतच लहान-सहान रोल करणाऱ्या विजयनं नंतर सहाय्यक भूमिकांमध्ये आपला ठसा उमटवण्यात यश मिळवलं. त्यानंतर २०१० मध्ये दिग्दर्शक सीनू रामसामी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. आता दिग्दर्शक एम. एस. श्रीपती यांच्या चित्रपटात विजय श्रीलंकन क्रिकेटचा लिजेंड असलेल्या मुरलीथरनच्या भूमिकेत दिसणार आहे. सुरेश प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून, दार मीडिया प्रा. लि. सहनिर्माते आहेत. यंदा डिसेंबर महिन्यात शूटिंगचा शुभारंभ करण्याची योजना आखण्यात आली आहे.हेही वाचा  -

पुरू बेर्डेंचा कुंचला म्हणतोय, 'बोल राजा बोल'

शबाना आझमी खाणार 'शीर कोर्मा'संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा