Advertisement

जलसावरील कंटेन्मेंट झोन पोस्टर हटवलं

जलसा बंगल्याच्या गेटवर लावलेलं कंटेन्मेंट झोनचं पोस्टर पालिकेने हटवलं आहे.

जलसावरील कंटेन्मेंट झोन पोस्टर हटवलं
SHARES

कोरोना पॉझिटिव्ह अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचं निदान झाल्यानंंतर बच्चन कुटुंबीय राहत असलेल्या जलसा बंगल्याचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. मुंबई महापालिकेने जलसा बंगल्यावर कंटेन्मेंट झोनचं पोस्टर लावलं होतं. आता जलसा बंगल्याच्या गेटवर लावलेलं कंटेन्मेंट झोनचं पोस्टर पालिकेने हटवलं आहे.  

अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याला आता पंधरा दिवस झाले आहेत. १४ दिवसांचा क्वारंटाइन पीरियड पूर्ण झाल्यानंतर आता पालिकेने जलसा बंगल्याचा क्षेत्र कंटेन्मेंट झोन मुक्त असल्याचं घोषित केलं आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांचं घर, ऑफिस आणि आजूबाजूचा परिसर संक्रमणमुक्त करण्यात आला आहे. १८ ते २० जणांच्या टीमने जलसाच्या आत सॅनिटायझेशन केलं आहे. त्यावेळी एक वॉर्ड ऑफिसरही तिथं उपस्थित होता.



हेही वाचा

लॉकडाउनच्या काळात अवैध मद्यविक्री प्रकरणी 'इतके' गुन्हे दाखल

अनलाॅकनंतर पुन्हा लाॅकडाऊन, पण रुग्णांची संख्या वाढतीच




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा