मासे खाणं सोनू निगमला पडलं महागात

प्रसिद्द गायक सोनू निगमला मासे खाणं चांगलंच महागात पडलंय. मासे खाल्यानंतर त्याला एलर्जी झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला सूज आली. त्यावेळी घाबरलेल्या सोनूने उपचारासाठी नानावटी रुग्णालयात धाव घेतली.

  • मासे खाणं सोनू निगमला पडलं महागात
SHARE

प्रसिद्द गायक सोनू निगमला मासे खाणं चांगलंच महागात पडलंय. मासे खाल्यानंतर त्याला एलर्जी झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्याला सूज आली आहे. त्यावेळी घाबरलेल्या सोनूनं उपचारासाठी नानावटी रुग्णालयात धाव घेतली. उपचार घेऊन घरी परतलेल्या सोनूनं त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली.


मासे खाल्यानं एलर्जी

सोनू निगमने मासे खाल्यानंतर काही तासातच सोनूच्या चेहऱ्याला सूज येण्यास सुरूवात झाली. त्यामुळे त्यानं तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्याच्यावर डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात उपचार केले. एलर्जीमुळे सोनूच्या चेहऱ्याची एक बाजू पूर्णतहा सुजली होती. त्यानं इन्स्टाग्रामवर दोन फोटो देखील शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत अॅलर्जीमुळे सुजलेला सोनूचा डोळा दिसतोय तर दुसऱ्या फोटोत त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोंसोबत त्यानं आपल्या चाहत्यांसाठी पोस्टदेखील लिहिली आहे.


सोनूने केले चाहत्यांना आवाहन

'तुमचे माझ्यावरील प्रेम पाहून मी भारावून गेलोय. पण मी दोन दिवसांपूर्वी काय स्थितीत होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मासे खाल्ल्यानं मला अॅलर्जी झाली आणि थेट आयसीयूमध्ये मला दाखल व्हावं लागलं. वेळीच उपचार मिळाले नसते तर हे प्रकरण माझ्या जीवावर बेतलं असतं. त्यामुळे तुम्ही काही गोष्टींचं सेवन करताना काळजी घ्या, असं त्यानं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा 

खासदार परेश रावल सोशल मिडियावर 'ट्रोल'


संबंधित विषय
ताज्या बातम्या