Advertisement

ऑस्कर सोहळ्यात मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन देसाईंना आंदराजली

2 ऑगस्ट 2023 रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. 'लगान' हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता.

ऑस्कर सोहळ्यात मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन देसाईंना आंदराजली
SHARES

96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात (Oscar Awards 2024) दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांना आदरांजली वाहण्यात आली. 'इन मेमोरियम' नावाच्या सत्रात जगभरातील यशस्वी दिवंगत कलावंतांचं स्मरण केलं जाते. त्यामध्ये यंदा नितीन देसाई यांचा देखील उल्लेख करण्यात आला. 

नितीन देसाईंना वाहिली आदरांजली

यंदाच्या अकादमी पुरस्कारांमध्ये जगभरातील कलाकारांना गौरविण्यात आले. या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्यात 'ओपेनहायमर' आणि 'बार्बी'ने सर्वाधिक पुरस्कार पटकावले. यावेळी, ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये दिवंगत भारतीय दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंगही आला. समारंभात भारतीय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नितीन देसाई हे खूप प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. इन मेमोरिअम सेगमेंटमध्ये नितीन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हे करण्यासाठी मंचावर एक व्हिडिओ प्ले करण्यात आला. याद्वारे नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काही काळ त्याचे चित्रही पडद्यावर दाखवण्यात आले. चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल त्यांना ही श्रद्धांजली वाहण्यात आली.ॉ7

आत्महत्या केली होती

2 ऑगस्ट 2023  रोजी दिग्दर्शक, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी स्वतःचं जीवन संपवलं होतं. 'लगान' हा चित्रपट 2002 साली ऑस्करला गेला होता. त्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई होते. लगानने सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटाच्या कॅटेगरीत अंतिम पाच चित्रपटात स्थान मिळवले होते. 'स्लमडॉग मिलेनियर' या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रपटाचं कला दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं.'स्लमडॉग मिलेनियर'या चित्रपट ओरिजनल स्कोअर कॅटेगरीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. 

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला

नितीन देसाई यांनी मोठ्या चित्रपटांसाठी काम केले आहे. 'जोधा अकबर' आणि 'लगान' यांसारख्या चित्रपटांसाठी त्यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. नितीन देसाई यांनीे 'लगान'चा सेट बांधला होता, या चित्रपटाला ऑस्करसाठीही नामांकन मिळाले होते. याशिवाय 'हम दिल दे चुके सनम'मध्येही काम केले. उल्लेखनीय आहे की, नितीन देसाई यांचा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मृत्यू झाला होता. यावेळी त्यांचे वय अवघे 57 वर्षे होते. मात्र, तोपर्यंत त्याने बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला होता.

'ओपनहायमर'ने ठसा उमटवला

अमेरिकेतील लॉस एंजलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 96 अॅकेडमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'ने ठसा उमटवला. अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियरला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. अभिनेता किलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार Hoyte Van Hoytema याला मिळाला.



हेही वाचा

'बिग बॉस 16' फेम शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकला ईडीचा समन्स

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा