Advertisement

'हा' अभिनेता घेऊन येतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक

एका मुलाखतीमध्ये अजय देवगणला छत्रपती शिवाजी महाराजांचा बायोपिक आला तर त्यात महाराजांची भूमिका कोणी साकारावी असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजयनं केला खुलासा...

'हा' अभिनेता घेऊन येतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर बायोपिक
SHARES

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अजय देवगणला छत्रपती शिवाजी महाराजांचा बायोपिक आला तर त्यात महाराजांची भूमिका कोणी साकारावी असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजयनं लागलीच अभिनेता रितेश देशमुखचं नाव घेतलं. कारण रितेश गेल्या काही दिवसांपासूनच शिवाजी महाराजांच्या बायोपिकवर काम करत असल्याचा खुलासा केला. मात्र त्यानं चित्रपटासंबंधी आणखी माहिती देणं टाळलं.



तान्हाजी’ हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक ओम राऊतनं केली आहे. चित्रपटात मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वठवणार आहेत. तसंच या चित्रपटाच्या निमित्तानं अजय आणि सैफही जोडी तब्बल १३ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.



खिलाडी अक्षय कुमार ठरला बॉक्स ऑफिसचा किंग

पेहचान कौन? 'लुडो' चित्रपटातल्या या भूमिकेची होतेय चर्चा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा