Advertisement

अक्षयच्या वाढदिवसाचे 'गोल्डन' गिफ्ट!


अक्षयच्या वाढदिवसाचे 'गोल्डन' गिफ्ट!
SHARES

बॉलिवूडचा खिलाडी 9 सप्टेंबरला ५० वर्षांचा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून अक्षयने चाहत्यांनाच एक भेट दिली आहे. आपल्या आगामी 'गोल्ड' चित्रपटाचं पोस्टर अक्षयने ट्वीटरवर शेअर केलं आहे



"प्रत्येक सरत्या वर्षानुसार माझे आयुष्य अधिक चांगले होत असल्याची जाणीव मला आहे. प्रत्येक चित्रपटात मला काहीतरी नवीन शिकायला मिळते. माझ्या हृदयाच्या जवळ असलेल्या चित्रपटाचं पोस्टर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे”, असे अक्षयने फोटो शेअर करत लिहिले आहे.

पोस्टर शेअर करण्यासोबतच अक्षयने त्याचा जन्म झाल्यापासूनचा कालावधी मिनिटे, तास, आठवडे आणि महिने या स्वरूपात ट्वीट केला आहे



अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सुवर्ण पदकावर अक्षयचा चेहरा आहे. शिवाय ऑलिम्पिकचे पाच रिंग असलेले चिन्ह आणि 'XIV Olympaid London 1948’ असेही लिहिले आहे. 'द ड्रीम दॅट युनायटेड अ नेशन' अशी टॅगलाइनही लिहिली आहे.

रीमा कागती दिग्दर्शित 'गोल्ड'ची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंट करत आहे. १९४८ मध्ये लंडनमध्ये झालेल्या १४व्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशाला पहिले सुवर्ण पदक मिळाले होते, त्यावर हा चित्रपट आधारीत आहे. गोल्ड चित्रपट पुढच्या वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

शिल्पा शेट्टीचे फोटो काढायला गेले, पडला मार...

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा