Advertisement

... अन्यथा मला किडनी विकावी लागेल, वीज बिलावर 'या' अभिनेत्याची धक्कादायक प्रतिक्रिया

अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांच्यानंतर आता 'या' अभिनेत्यानं विजेचं बिल भरण्यासाठी आपल्या पेंटिग्स विक्रीसाठी काढल्या आहेत.

... अन्यथा मला किडनी विकावी लागेल, वीज बिलावर 'या' अभिनेत्याची धक्कादायक प्रतिक्रिया
SHARES

कोरोनाच्या संकटात नागरिक आणखी एका गोष्टानं त्रस्त झाले आहेत ते म्हणजे अव्वाच्या सव्वा येणाऱ्या विजेच्या बिलामुळे. आधीच कोरोनामुळे अनेकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. अनेक जण आर्थिक तंगीचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत कसं तर आलेला दिवस लोकं ढकलत आहेत. पण त्यात विजेचं आलेलं भरमसाट बिल भरायचं कसं हा प्रश्न लोकांना पडला आहे. सामन्यांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील याचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे.  

अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे यांच्यानंतर आता अभिनेता अर्शद वारसी यानं विजेचं बिल भरण्यासाठी आपल्या पेंटिग्स विक्रीसाठी काढल्या आहेत. एका वृत्तपत्राशी बोलताना त्यानं आपले अनुभव शेअर केले. त्याने चाहत्यांना पेंटिग्स विकत घेण्याची मागणी केली आहे. मला अदानीचं विजेचं बिल भरण्यासाठी पैशांची गरज असल्यानं माझी पेंटिग्स खरेदी करा, असं त्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. माझ्या किडण्या मी पुढील बिलासाठी राखून ठेवत असल्याचंही त्यानं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

यापूर्वी तापसी पन्नुनेही आपल्या वाढत्या विजेच्या बिलावर प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर रेणुका शहाणे यांनीही इतकं बिल कसं आलं? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मात्र एकाच वेळेस बिल भरणं शक्य नसेल तर इन्स्टाॅलमेंटमध्ये भरा असं सुचवलं होतं.हेही वाचा

बॉलिवूडमधील दुजाभाव पुन्हा समोर, कुनाल खेमू, विद्युत जामवाल संतप्त

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स

रत्नाकर मतकरींना ‘पणशीकर’ रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार

संबंधित विषय
Advertisement