Advertisement

मेहंदी चित्रपटातील अभिनेता फराज खानचं निधन

गेल्या काही दिवसांपासून फराज बेंगळूरु इथल्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

मेहंदी चित्रपटातील अभिनेता फराज खानचं निधन
SHARES

बॉलिवूड अभिनेता फराज खानचं निधन झालं आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून फराज बेंगळूरु इथल्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली.

अभिनेत्री पूजा भट्टनं फराज खानच्या निधनाची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ‘मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की अभिनेता फराज खानचं निधन झालं आहे. तुम्ही सर्वांनी त्याला आर्थिक मदत केली आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’ या आशयाचे ट्विट पूजा भट्टनं केलं आहे.

फराज खानला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. फंडरेजिंग वेबसाइटवर फराजच्या प्रकृतीविषयी त्याच्या कुटुंबीयांनी माहिती दिली होती. त्यानुसार, गेल्या एका वर्षापासून त्याची तब्येत खालावत गेल्याचं सांगण्यात आलं होतं.

फराजला कफची तक्रार होती, त्यानंतर त्याच्या छातीत संसर्ग झाला होता. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला, पण तोपर्यंत संसर्ग खूप वाढला होता. छातीमधून हर्पिसचा संसर्ग फराजच्या मेंदूपर्यंत पोहोचला होता आणि तेव्हापासून त्याची प्रकृती अतिशय गंभीर झाली होती.

फराज खान हा गतकाळातील कॅरेक्टर आर्टिस्ट युसुफ खान ('अमर अकबर अँथनी' फेम जेबिसको) यांचा मुलगा होता. राणी मुखर्जी स्टारर 'मेहंदी' (1998) मध्ये त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी 'फरेब' (1996), 'पृथ्वी' (1997) आणि 'दिल ने फिर याद किया' (2001) सारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला होता.

याशिवाय तो छोट्या पडद्यावरही दिसला होता. ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ या मालिकांमध्ये त्यानं काम केलं होतं.



हेही वाचा

विनयभंगाच्या आरोपानंतर कौवा बिर्यानी फेम विजय राजची चित्रपटातून हकालपट्टी

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ दिवासापासून सुरू होणार सिनेमागृह, नाट्यगृह

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा