Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; अभिनेते गोविंदाला कोरोनाची लागण


बॉलिवूडला कोरोनाचा विळखा; अभिनेते गोविंदाला कोरोनाची लागण
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वाढत्या प्रदूर्भावानं बॉलिवूडलाही कोरोनानं ग्रासलं आहे. अनेक बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः गोविंदा यांनी दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

'मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची कोरोन चाचणी केली असून त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. पत्नी सुनीता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती. माझी प्रकृती ठिक असून मी सध्या होम क्वॉरंटाईन आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी', अशी विनंतीही गोविंदा यांनी दिली.

आलिया भट्ट, रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. हेही वाचा -

बापरे! अक्षय कुमारनंतर तब्बल ४५ सहकलाकारांना कोरोनाची लागण

Maharashtra Weekend Lockdown : काय सुरू काय बंद? जाणून घ्या!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा