Advertisement

इरफान खान यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा

बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी इरफान खान यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

इरफान खान यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा
SHARES

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यानं अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, इरफानला पोटाचा त्रास झाला होता. त्याला कोलन इन्फेक्शन झालं होतं.

गेल्या आठवड्याभरापासून आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचा हा प्रतिभावंत कलाकार असा अचानक निघून गेल्यानं चाहते आणि बॉलिवूडकर यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.  

इरफान खान यांच्या निधनानंतर ट्वीटरवर #IrrfanKhan, #Irfan Khan, #RestInPeace, Bollywood, #AngreziMedium असे काही ट्रेंड सुरू झाले आहेत. त्याचे चाहते आणि बॉलिवूड कलाकार ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त करत आहे.  


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा