Advertisement

रणवीर सिंह दीपिकासाठी गातो तेव्हा!


रणवीर सिंह दीपिकासाठी गातो तेव्हा!
SHARES

अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे अनेक चाहते आहेत. या असंख्य चाहत्यांमध्ये एक चाहता म्हणजे रणवीर सिंह. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं. पण अनेकदा त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनाही उधाण येतं. मात्र, मीडियानं वर्तवलेला हा अंदाज नेहमीच चुकीचा सिद्ध होतो. दिवसेंदिवस त्यांचे नाते अधिक दृढ होत चालले आहे. याचाच प्रत्यय इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या एका व्हीडिओतून येतोय.https://www.instagram.com/p/Bb7b1fXl2Ia/" style=" color:#000; font-family:Arial,sans-serif; font-size:14px; font-style:normal; font-weight:normal; line-height:17px; text-decoration:none; word-wrap:break-word;" target="_blank">Update: ???? Ranveer Singh's special message for Deepika Padukone on #LuxGoldenDivas 'Your like a glowing ray of light, you bring light into my life ' ❤️ Tfs @ranveersinghtbt ????

A post shared by RanveeriansWorldwide (@ranveeriansfc) on


या व्हिडिओमध्ये रणवीर दीपिकासाठी 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा', असं गाणं गाताना दिसत आहे. रणवीरला सर्वांसमोर गाणं गाताना पाहून दीपिकाला आश्चर्याचा धक्काच बसतो. फक्त गाणंच नाही, तर रणवीरनं दीपिकासाठी एक मेसेजही दिला. "करोडो चाहत्यांप्रमाणे तू माझं आयुष्य देखील प्रकाशमान केलं आहेस. देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे की, तुझ्या आयुष्यातही असा आनंद कायम राहो. कारण तुझ्यासारखं दुसरं कुणीच नाही," अशा शब्दांत रणवीरनं आपल्या भावना व्यक्त केल्या.हेही वाचा

'सुपर हिरो है ये पगला'


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा