Advertisement

बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानचं निधन

वाजिद खान यांचे जवळचे मित्र सलिम मरचंट यांनी वाजिद खान यांच्या निधनाची बातमी दिली.

बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानचं निधन
SHARES

बॉलिवूडमधील सध्याचे आघाडीचे संगीतकार वाजिद खान यांचं निधन झालं आहे. चेंबूर मधल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४२ वर्षांचे होते. कोरोनामुळे त्यांचं निधन झाल्याचं बोललं जातंय. पण यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यांना अनेक आजार देखील होते. त्यामुळे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. 

वाजिद खान यांचे जवळचे मित्र सलिम मरचंट यांनी ट्विटरवर म्हटलं की, साजिद-वाजिद या जोडीतील वाजिद आपल्यात राहिला नाही हे सांगताना मला दु:ख होत आहे. या कठिण परिस्थित देव त्याच्या कुटुंबियांना ताकद दे. मला खूप धक्का बसला आहे. मी पूर्णपणे तुटलो आहे.   


कशामुळे निधन?

वाजिद यांना किडनीचा तसंच हृदयविकाराचा त्रास होता. काही दिवसांपूर्वीच त्यांची किडनी ट्रान्सप्लांट झाली होती. तीन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. पण त्यांच्या मृत्यूचं कारण कोरोना नसल्याचा दावा करण्यात येत आहे. कार्डिक अरेस्टनं त्यांचं निधन झाल्याचं बोललं जातंय.

याशिवाय त्यांची किडनी निकामी झाल्याची देखील चर्चा आहे. त्यांना मधुमेह देखील होता. या आजाराच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. गेले ४ दिवस वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही.


सलिम मरचंट काय म्हणाले?

सलिम मरचंट यांनी पीटीआयला माहिती दिली की, त्याला बरेच आजार होते. त्याला किडनीचा त्रास होता. त्याचं किडनी ट्रान्सप्लांट पण झालं आहे. पण काही दिवसांपूर्वी त्याला किडनीचं इनफेक्शन झाल्याचं कळालं. तो गेल्या चार दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होता. पण त्यांची प्रकृती अजून खालावत गेली. किडनी इनफेक्शनमुळे त्याची प्रकृती अजून बिघडली.


दफन विधी होणार

उपचारा दरम्यान कोरोनाचं निदान झाल्यानं त्यांच्या दफनविधीसाठीदोनच लोकांना अनुमती देण्यात आली आहे. वर्सोव्याच्या कब्रिस्तानमध्ये त्यांच्यावर सुपुर्द-ए-खाक विधी करण्यात येईल.


बॉलिवूडवर शोककळा

वाजिद खान यांच्या निधनानं बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीनं श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

'दबंग', 'वॉन्टेड', 'वीर', 'नो प्रॉब्लेम', 'गॉड तुस्सी ग्रेट हो', 'पार्टनर' यासह सलमानच्या विविध चित्रपटांची गाणीही वाजिद यांनी गायली होती. साजिद-वाजिद जोडीनं 'एक था टायगर', 'दबंग', 'दबंग २', 'दबंग ३', 'पार्टनर', 'सन ऑफ सरदार', 'रावडी राठोड', 'हाउसफुल २' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिलं आहे.

याशिवाय टीव्हीवरील प्रसिद्ध 'सारेगमप २०१२', 'सारेगमप सिंगिंग सुपरस्टार' शोसाठी या जोडीनं परीक्षक म्हणून काम पाहिलं होते. आयपीएल-४ चं थीम सॉंग 'धूम धूम धूम धडाका' याच जोडगोळीनं संगीतबद्ध केलं होतं.



हेही वाचा

Lockdown 5.0: मालिका, सिनेमाच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात परवानगी

किरण कुमारांचा तिसरा कोरोना रिपोर्ट आला समोर, कुटुंब अजूनही...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा