Advertisement

Lockdown 5.0: मालिका, सिनेमाच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात परवानगी

चित्रीकरणाची कामे रखडल्याने या इंडस्ट्रीवर विसंबून असलेले कलाकार आणि कामगारांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शुक्रवार २२ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा

Lockdown 5.0: मालिका, सिनेमाच्या चित्रीकरणाला महाराष्ट्रात परवानगी
SHARES
Advertisement

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीतील संपूर्ण कामे ठप्प झाली होती. त्यामुळे चित्रपटसृष्टीला मोठा आर्थिक फटका बसत होता. हे लक्षात घेऊन लाॅकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काही अटी-शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास शासनाने (Maharashtra government allowed shooting for tv and movie in lockdown 5.0) मान्यता दिली आहे, याबाबतचा शासन निर्णय रविवार ३१ मे रोजी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे.

चित्रीकरणाची कामे रखडल्याने या इंडस्ट्रीवर विसंबून असलेले कलाकार आणि कामगारांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शुक्रवार २२ मे रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली होती. या चर्चेत फाऊंडेशनचे अध्यक्ष एन पी सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे.डी. मजिठीया, नितीन वैद्य, एकता कपूर, पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा - Lockdown 5.0: महाराष्ट्रात ३ जूनपासून 'या' सेवांना असेल परवानगी

मुंबईतील फिल्मसिटीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगून चित्रीकरण सुरु होऊ शकतं का? याची चाचपणी करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य सचिवांना देण्यात आले आहेत. शिवाय चित्रीकरणाबाबतचा आराखडा लगेच सादर केल्यास रेड झोन्स मधील शहरे वगळून इतरत्र चित्रीकरण स्थळे उपलब्ध होतील का? यावर शासन निर्णय घेईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंडियन ब्रॉडकास्टर्स फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना दिलं होतं. 

त्यानुसार अटी-शर्तींच्या अधीन राहून शासनाने चित्रीकरणास परवानगी दिली आहे. निर्मात्यांना आता निर्मितीपूर्वीची आणि निर्मितीनंतरची कामे शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार करता येणार आहेत. कोविडसंदर्भात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक सूचना या चित्रीकरणासाठी देखील लागू राहणार असून नियमांचा भंग केल्यास कामे बंद करण्यात येणार असल्याचेही या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.

मुंबईत चित्रीकरण परवानगीसाठी निर्मात्यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, दादासाहेब फाळके चित्रनगरी , गोरेगाव यांच्याकडे तसंच उर्वरित जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे.


संबंधित विषय
Advertisement