Advertisement

ओ माय गॉड! चित्रपटाच्या सेटवर क्रू मेंबर कोविड पॉझिटिव्ह

पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार आणि यामी गौतम स्टारर 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे.

ओ माय गॉड! चित्रपटाच्या सेटवर क्रू मेंबर कोविड पॉझिटिव्ह
SHARES

कोरोना महामारीचा मोठा फटका बसल्यानंतर चित्रपट इंडस्ट्री हळूहळू पुन्हा रुळावर येण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग आता पुन्हा सुरू झालं आहे.

यात पंकज त्रिपाठी, अक्षय कुमार आणि यामी गौतम स्टारर 'ओह माय गॉड 2' या चित्रपटाचा देखील समावेश आहे. मात्र चित्रपटाच्या सेटवरील क्रू मेंबर्स कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्मात्यांना पुन्हा शूटिंग थांबवावं लागलं आहे.

'ओएमजी २ चित्रपटाचे शूटिंग गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू होते. या चित्रपटाच्या सेटवर ६ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. चित्रपटाचे निर्माते अश्विन वालदे यांनी टेस्ट रिपोर्ट आल्यानंतर दोन आठवड्यांसाठी शूटिंग थांबवले आहे.

मिड डेने चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, गेल्या आठवड्यात ७ क्रू मेंबर्सचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अशा परिस्थितीत सुरक्षा बाळगत प्रत्येकाला होम-क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उर्वरित युनिटच्या लोकांची चाचणी केली जात आहे.

रिपोर्टनुसार, टीममधील सर्व सदस्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर शूटिंग सुरू करण्यात आले होते. परंतु दोन दिवसांत काही लोकांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली. यानंतर, शूटिंग थांबवून नव्यानं टेस्ट केल्या जात आहेत.

टेस्ट दरम्यान ६ क्रू मेंबर संक्रमित आढळले आहेत. चित्रपटाचे मुख्य कलाकार पंकज त्रिपाठी, यामी गौतम आणि दिग्दर्शक अमित राय यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. संसर्ग पसरू नये म्हणून शूटिंग त्वरित थांबवण्यात आलं. आता ऑक्टोबरच्या अखेरीस चित्रपटाचं शूटिंग पुन्हा सुरू होईल.

अक्षय कुमार त्याच्या 'रक्षाबंधन' चित्रपटानंतर 'ओह माय गॉड 2' चे शूटिंग सुरू करणार होता. मुंबईनंतर या चित्रपटाचे चित्रीकरण उज्जैनमध्ये होणार आहे. अक्षय २० दिवस शूट करेल त्यानंतर तो 'राम सेतू' आणि 'सिंड्रेला'चे चित्रीकरण सुरू करेल.

अमित राय दिग्दर्शित 'ओह माय गॉड २' हा २०१२ च्या 'ओह माय गॉड'चा सिक्वेल आहे. ज्यात यामी गौतम, पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



हेही वाचा

सेलिब्रेटिंच्या पत्नी आरशासमोर उभं राहून... शर्लीन चोप्राचा खुलासा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा