Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

करण जोहरनं 'दोस्ताना २'मधून कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता का दाखवला?

आता कार्तिकच्या ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेतले असल्याचं समोर आलं आहे.

करण जोहरनं 'दोस्ताना २'मधून कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता का दाखवला?
SHARES

प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. २०१८ मध्ये ‘दोस्ताना २’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

कार्तिक आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता कार्तिकच्या ऐवजी दुसऱ्या एका अभिनेत्याला मुख्य भूमिकेत घेतले असल्याचं समोर आलं आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘दोस्ताना २’ चित्रपटाचे चित्रीकरण कार्तिकनं सुरू केलं होतं. त्यानं २० दिवसांचं चित्रीकरण झाल्यानंतर पुढील डेट्स देण्यास नकार दिला होता.

सध्या अनेक प्रोजक्ट्स कार्तिककडे असल्यामुळे तो इतर कामात व्यस्त आहे. तसंच या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील कार्तिकला फारशी आवडली नसल्यामुळे त्यानं डेट्स दिल्या नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता करण जोहरनं त्याला चित्रपटातून काढून टाकल्याचं समोर आलं आहे.

जान्हवी कपूर आणि कार्तिक आर्यननं २०१९मध्ये नोव्हेंबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. अमृतसर इथं चित्रीकरण करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता ‘दोस्ताना २’ या चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा