Advertisement

आता श्रीदेवी यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी

श्रीदेवी यांचे कॉल रेकॉर्ड्स दुबई पोलिस तपासणार असल्याचं वृत्त आहे. यामध्ये वारंवार त्यांना कॉल करण्यात आलेल्या क्रमांकावर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. याशिवाय, ज्या हॉटेलमध्ये श्रीदेवी थांबल्या होत्या, त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

आता श्रीदेवी यांच्या कॉल रेकॉर्ड्सची तपासणी
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर जसजसं त्यांचं पार्थिव मुंबईत यायला उशीर होत आहे, तसतसं त्यांच्या मृत्यूबाबत गूढ वाढू लागलं असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. त्याचदरम्यान आता श्रीदेवी यांचा मृत्यू ज्या हॉटेलमध्ये झाला, तिथले आणि श्रीदेवी यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.


नक्की मृत्यू कशामुळे? गूढ कायम

श्रीदेवी यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाल्यावर फॉरेन्सिक रिपोर्ट्सने शिक्कामोर्तब केल्याचं वृत्त गल्फ न्यूज या दुबईतील वृत्तसंस्थेने दिलं आहे. मात्र, श्रीदेवी बाथटबमध्ये कशा पडल्या, याविषयी अद्याप कोणतीही खात्रीलायक माहिती हाती आलेली नाही. काही सूत्रांच्या दाव्यानुसार त्या अल्कोहोलच्या अंमलाखाली असल्यामुळे बाथटबमध्ये पडल्या, तर काही सूत्रांच्या दाव्यानुसार ह्रदय बंद पडल्यामुळे त्या बेशुद्ध होऊन पडल्या.


हॉटेल स्टाफचीही चौकशी होणार?

या सर्व पार्श्वभूमीवर श्रीदेवी यांचे कॉल रेकॉर्ड्स दुबई पोलिस तपासणार असल्याचं वृत्त आहे. यामध्ये वारंवार त्यांना कॉल करण्यात आलेल्या क्रमांकावर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. याशिवाय, ज्या हॉटेलमध्ये श्रीदेवी थांबल्या होत्या, त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. मात्र, या माहितीला कोणताही सबळ दुजोरा मिळू शकलेला नाही.


नक्की काय झालं होतं त्या रात्री?

शनिवारी मध्यरात्री श्रीदेवी यांचा अकस्मिक मृत्यू ओढवला. त्यावेळी त्या दुबईमध्ये त्यांचा भाचा मोहित मारवाच्या लग्नासाठी गेल्या होत्या. लग्नानंतर त्यांचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर आणि संजय कपूर मुंबईत परतले होते. मात्र, श्रीदेवी दुबईतच त्यांची बहीण श्रीमाला यांच्यासोबत राहिल्या होत्या. श्रीदेवी यांना सरप्राईज देण्यासाठी बोनी कपूर एक दिवसानंतर पुन्हा दुबईला गेले. त्यांनी शनिवारी रात्री एकत्र जेवण्याचा प्लॅनही केला. मात्र, त्याआधी आंघोळीला गेलेल्या श्रीदेवी तिथेच बाथटबमध्ये पडल्या आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला.



हेही वाचा

दुबईतल्या लग्न सोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे क्षण...


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा