चित्रपट निर्माते राज कुमार बडजात्या यांचं निधन

मुंबईतल्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

SHARE

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते राज कुमार बडजात्या यांचं गुरुवारी सकाळी निधन झालं. राजश्री प्रोडक्शननं देखील त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतल्या सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राज कुमार बडजात्या यांच्या प्रॉडक्शननं आत्तापर्यंत एकापेक्षा एक चित्रपटांची निर्मिती केली. पिया का घर, हम आपके है कौन, हम साथ साथ है, विवाह, प्रेम रतन धन पायो अशा चित्रपटांची निर्मिती राजश्री प्रॉडक्शननं केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचे ते वडिल होते. राज कुमार बडजात्या यांच्या पश्चात त्यांची सुधा बडजात्या आणि मुलगा सुरज बडजात्या असा परिवार आहे.

केवळ प्रेम रंग उधळणारे कौटुंबिक सिनेमे ही राजश्री प्रोडक्शनंची खासियत राहिली आहे. राजकुमार यांच्या सिनेमात वॉइलेंसला कुठेही थारा नव्हता. याच कारणामुळे त्यांचे सिनेमे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरले.  १५ फेब्रूवारी रोजी राजश्रीच्या बैनरखाली तयार झालेला "हम चार' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.


संबंधित विषय
ताज्या बातम्या