Advertisement

'ट्रॅजडी क्विन' मीना कुमारीला गुगलची आदरांजली


'ट्रॅजडी क्विन' मीना कुमारीला गुगलची आदरांजली
SHARES

बॉलिवूडची 'ट्रॅजडी क्विन' अर्थात अभिनेत्री मीना कुमारी यांचा आज ८५ वा जन्मदिवस आहे. मीना कुमारी यांचा जन्म मुंबईत १ अॉगस्ट १९३२ मध्ये झाला. हिंदी सिनेसृष्टीत मीना कुमारी यांचं नाव आजही दमदार अभिनेत्रींमध्ये समाविष्ट केलं जातं. आपल्या ३० वर्षांच्या सिनेकारकिर्दित त्यांनी ‘पाकिजा’, ‘काजल’, ‘बैजू बावरा’ आणि ‘फूल और पत्थर’ यांसारखे हिट सिनेमे दिले. मीना कुमारी यांच्या वाढदिवसाला गूगलने डुडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.



मीना कुमारी यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी


  • मीना कुमारी यांचं मूळ नाव महजबीन बानो असं होतं. पण बॉलिवूडमध्ये त्यांना मीना कुमारी या नावानं ओळख मिळाली.
  • दिलीप कुमार यांना ट्रॅजडी किंग म्हणून तर मीना कुमारी यांना ट्रॅजडी क्वीन म्हणून ओळखलं जातं. 
  • वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी नेहमीच गंभीर भूमिका साकारल्या. प्रेमात अयशस्वसी झाल्याने त्या दारूच्या आहारी गेल्या.
  • एवढी नामवंत अभिनेत्री असताना त्यांच्या आयुष्याच्या शेवटचा काळ दुख:द ठरला. त्यांच्याकडे हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठीही पैसे नव्हते. मात्र त्यांच्या एका चाहत्याने ते पैसे भरले.
  • असं ही म्हटलं जातं की त्या धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या होत्या. मात्र धर्मेंद्र यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याने त्या दारूच्या आहारी गेल्या. 
  • पाकिजा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ३१ मार्च १९७२ मध्ये त्यांचं निधन झाले. त्यावेळी त्या अवघ्या ३९ वर्षाच्या होत्या.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा