Advertisement

हिमेश बनला हॅप्पी आणि हार्डी

आपल्यालाही कधीतरी दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. गायक-संगीतकार-अभिनेता हिमेश रेशमियाची ही इच्छा 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या चित्रपटात पूर्ण झाली आहे.

हिमेश बनला हॅप्पी आणि हार्डी
SHARES

आपल्यालाही कधीतरी दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. गायक-संगीतकार-अभिनेता हिमेश रेशमियाची ही इच्छा 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या चित्रपटात पूर्ण झाली आहे.


दुहेरी भूमिकेत

कारकिर्दीच्या सुरुवातीला संगीतकार, नंतर गायक आणि मग अभिनेता असे स्वत:च्या अंगी दडलेले कलागुण दाखवत नावारूपाला आलेला हिमेश रेशमिया आता दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या आगामी हिंदी चित्रपटात प्रेक्षकांना हिमेशचं दुहेरी रूप पहायला मिळणार असून या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये हिमेशनं साकारलेल्या हॅप्पी आणि हार्डी या दोन मुख्य व्यक्तिरेखांची झलक पहायला मिळते.


सोनिया मान मुख्य भूमिकेत

आजवरच्या कारकिर्दीमध्ये हिमेशनं प्रथमच दुहेरी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी राका यांनी केली आहे. रोमँटिक-म्युझिकल लव्ह स्टोरी असलेल्या या चित्रपटात हिमेशसोबत सोनिया मान मुख्य भूमिकेत आहे. दिपशिखा देशमुख आणि सबिता मानेकचंद यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा संपूर्ण चित्रपट ग्लास्गो येथे शूट करण्यात आला आहे. त्यामुळं ग्लास्गोमधील नयनरम्य लोकेशन्स या चित्रपटाच्या निमित्तानं रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहेत. यंदा सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.


दोन व्यक्तिरेखांसोबत रोमांस 

पंजाबी अभिनेत्री सोनिया मानचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून, 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या ट्राएंगल लव्ह स्टोरीमध्ये ती एकाच नायकाने साकारलेल्या दोन व्यक्तिरेखांसोबत हीर बनून रोमांस करताना दिसणार असल्याचं समजतं. या चित्रपटाच्या शीर्षकात बरेच बदल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सुरुवातीला हा चित्रपट 'मैं हूं ना' या शीर्षकांतर्गत बनणार होता, पण नंतर हिमेशनं 'नमस्ते लंडन' चित्रपटासाठी कंपोज केलेल्या 'मैं जहां रहूं...' या गाजलेल्या गाण्यावर याचं शीर्षक ठेवण्यात आलं होतं. अखेरीस 'हॅप्पी हार्डी अँड हीर' या फायनल टायटलसह हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.हेही वाचा -

सात वर्षांनी एकत्र येणाऱ्या उमेश-प्रियाला 'आणि काय हवं'

बिग बॉसमध्ये एक डाव भुताचा
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा