Advertisement

बिग बॉसमध्ये एक डाव भुताचा

बिग बॉसमध्ये भांडणं आणि वाद विवाद नेहमीच होतात असतात, पण प्रेक्षकांना आकर्षण असतं ते या घरात नेमून दिल्या जाणाऱ्या विविध कार्यांचं. या आठवडयात बिग बॉसच्या घरी एक डाव भुताचा पहायला मिळणार आहे.

बिग बॉसमध्ये एक डाव भुताचा
SHARES

बिग बॉसमध्ये भांडणं आणि वाद विवाद नेहमीच होतात असतात, पण प्रेक्षकांना आकर्षण असतं ते या घरात नेमून दिल्या जाणाऱ्या विविध कार्यांचं. या आठवडयात बिग बॉसच्या घरी एक डाव भुताचा पहायला मिळणार आहे.


बिग बॉसमध्ये थरार

'एक डाव भुताचा' म्हटलं की सर्वप्रथम आठवतो तो अशोक सराफ अभिनीत थरारपट. बिग बॉसमध्येही आता असाच काहीसा थरार पहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घरात आता भूतं वावरताना दिसणार आहेत. घरातील सदस्य या भूतांचा कशा प्रकारे सामना करतात, यांच्या अघोरी कृत्यापासून स्वत:चा कसा बचाव करतात आणि त्यांच्यावर कशी मात करतात हा खेळ या आठवड्यात बिग बॉसच्या घरात रंगणार आहे. भूत म्हटलं की अनाहुतपणे भीती वाटतेच, पण ही भूतं काहीशी गंमतीशीर असल्याचं पहायला मिळणार आहे.


केव्हीआर ग्रुपचे खटके

या घरामध्ये कायम कोणाचे ना कोणाचे तरी खटके उडतच असतात. त्यानुसार नेहमीप्रमाणं केव्हीआर ग्रुपचे खटके उडाले. इतकी चर्चा या ग्रुपमध्ये कसली होते याबद्दल वैशाली, शिव आणि माधव यांच्यामध्ये बातचीत सुरू होती. तर किशोरी यांनी सकाळी झालेल्या प्रकारामुळं कॅमेराकडं आपली खंत व्यक्त केली. माधवनं किशोरी यांना विचारलं की, सगळं झालं का बरोबर, गैरसमज दूर झाले का? 


रुपालीनं माफी मागितली

माधवनं केलेल्या विचारपूसबद्दल किशोरी यांनी रुपालीला येऊन सांगितलं, तेव्हा रुपालीचं म्हणणं होतं की, आपल्या ग्रुपमध्ये काय होत आहे, का भांडण होतं याबद्दल प्रत्येकालाच जाणून घ्यायचं असतं. तर दोघींचं म्हणणं होतं की, पण आपलं तसं काही नाही. दुसऱ्यांच्या ग्रुपमध्ये काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कधीच जात नाही. आपण कधीच दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन डोकावत नाही. तर रुपालीनं किशोरी यांची माफी मागितली. रुपालीनं किशोरी यांना विचारणा झालेल्या सगळं नीट आहे ना ग्रुपमध्ये त्याबद्दल वीणाला सांगितलं की, तिचं म्हणणं होतं मी ग्रुपमध्ये नाही, मी वैयक्तिक खेळत आहे. जे ग्रुपमध्ये आहेत त्यांनी बोलावं.


कोण स्पर्धेत राहणार?  

खटक्यांच्या या वातावरणात घरामध्ये एक डाव भुताचा हे साप्ताहिक कार्य रंगणार आहे. या कार्याचा परिणाम पुढील आठवड्याच्या कॅप्टनसीवर होणार आहे. कार्यात वेळोवेळी वाजणाऱ्या बझरनंतर भूत झालेला सदस्य जर सेफमध्ये जाऊ शकला नाही, तर तो सदस्य कॅप्टनसीच्या स्पर्धेतून बाहेर पडेल. आता कोण स्पर्धेत राहणार? आणि कोण बाद होणार? हे पहायचं आहे.हेही वाचा-

'स्वराज्य जननी जिजामाता'च्या रूपात अमृता पवार

कशासाठी, तर चाहत्यांच्या प्रेमासाठी - तेजश्री प्रधान
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा