Advertisement

'हंगामा २' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

ट्विटच्या माध्यमातून अभिनेता परेश रावल यांनी ही 'गुड न्यूज' चाहत्यांना दिली आहे.

'हंगामा २' चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला
SHARES

प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी प्रियदर्शन यांचा 'हंगामा २' पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येत आहे. ट्विटच्या माध्यमातून अभिनेता परेश रावल यांनी ही 'गुड न्यूज' चाहत्यांना दिली आहे. चित्रपटात परेश रावल, शिल्पा शेट्टी, मिनाझ जाफरी आणि दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहे

जानेवारी महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. तर १४ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. परेश रावल, आफताफ, अक्षय खन्ना, रिमी सेन यांची प्रमुख भूमिका असलेला 'हंगामा' चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. मजेशीर कहाणीमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती देखील दिली होती.  

जवळपास १७ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर ७ वर्षांनी परेश रावल प्रियदर्शनी यांच्यासोबत काम करणार आहेत. परेश रावल यांनी प्रियदर्शन दिग्दर्शित 'हेरा फेरी', 'भागम् भाग', 'मालामाल विकली' सारख्या हिट कॉमेडी चित्रपटात काम केलं आहे. हंगामा चित्रपटानं जितकं प्रेक्षकांना खळखळून हसवलं तितकाच हा चित्रपटही यशस्वी होईल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.



हेही वाचा

स्वप्नपूर्तीसाठी एका आईनं घेतलेला 'पंगा'

'हा' बॉलिवूड कलाकार साकारणार सुपरहिरोची भूमिका


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा