Advertisement

टायगर बनणार बायचुंग भुतीया

आज बॅालिवुडमधल्या बऱ्याच कलाकारांनी कोणा ना कोणाचा बायोपीक केला आहे, तर काही जण आजही बायोपीकच्या शूटमध्ये बिझी आहेत. अशातच टायगर श्रॅाफही आता बायोपीकमध्ये दिसणार असल्याची बातमी आली आहे.

टायगर बनणार बायचुंग भुतीया
SHARES

मागील एक-दोन वर्षांपासून चित्रपटसृष्टीत बायोपीकचं भरघोस पीक आल्याचं पाहायला मिळत आहे. आता आणखी एक बायोपीक बनणार आहे, ज्यात टायगर श्रॅाफ टायटल रोल साकारणार आहे.


टायगर श्रॅाफ बायोपीकमध्ये 

आज बॅालिवुडमधल्या बऱ्याच कलाकारांनी कोणा ना कोणाचा बायोपीक केला आहे, तर काही जण आजही बायोपीकच्या शूटमध्ये बिझी आहेत. अशातच टायगर श्रॅाफही आता बायोपीकमध्ये दिसणार असल्याची बातमी आली आहे. नुकताच टायगरचा 'स्टुडंट आॅफ द इयर २' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या तो ऋतिक रोशनसोबत आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करण्यात बिझी आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. त्यानंतर तो 'बागी ३'चं शूट पूर्ण करणार आहे.


फुटबॅाल खेळाडू 

अशा आपल्या अत्यंत बिझी शेड्युलमध्ये टायगरला बायचुंग भुतिया यांच्या जीवनावर आधारीत असलेल्या चित्रपटात काम करण्याची आॅफरही आली आहे. 'जिला गाझियाबाद' फेम दिग्दर्शक आनंद कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. आनंद कुमार यांनी दिलेली आॅफर टायगरनं स्वीकारली आहे की नाही याबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. टायगरनं जर ही भूमिका साकारायची ठरवली, तर तो भुतिया यांच्या कॅरेक्टरला योग्य न्याय देऊ शकतो. कारण टायगर एक चांगला फुटबॅाल खेळाडू आहे. 


स्क्रीप्ट आवडली 

कायम स्वत:च्या फिटनेसबाबत जागरूक असणाऱ्या टायगरला फुटबॅाल खेळायला आवडतं. त्यामुळंच भुतिया यांच्यावर चित्रपट बनवण्याचा विचार येताच आनंद कुमार यांच्या डोळ्यांसमोर सर्वप्रथम टायगरचाच चेहरा आल्याचं समजतं. टायगरलाही चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे, पण आपल्या बिझी शूटिंग शेड्युलमधून तो या चित्रपटासाठी कशा प्रकारे तारखा देतो यावर पुढील खेळ अवलंबून आहे. हा चित्रपट भूतिया यांचा संघर्ष आणि स्वप्नांची सांगड घालणारा असेल. याखेरीज मैदानाबाहेरचे भुतियाही या चित्रपटात पाहायला मिळतील.



हेही वाचा -

मी तंबाखूची जाहिरात करतच नाही, अजय देवगणचं चाहत्याला उत्तर

'गुलाबो सिताबो'साठी अमिताभ-आयुष्यमान प्रथमच एकत्र




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा