Advertisement

'गुलाबो सिताबो'साठी अमिताभ-आयुष्यमान प्रथमच एकत्र

अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. आयुष्यमान खुरानानंही अल्पावधीत आपला ठसा उमटवला आहे. आता हे दोघेही 'गुलाबो सिताबो'मध्ये एकत्र दिसणार आहेत.

'गुलाबो सिताबो'साठी अमिताभ-आयुष्यमान प्रथमच एकत्र
SHARES

अमिताभ बच्चन यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. आयुष्यमान खुरानानंही अल्पावधीत आपला ठसा उमटवला आहे. आता हे दोघेही 'गुलाबो सिताबो'मध्ये एकत्र दिसणार आहेत.


कॅामेडी चित्रपटावरही काम

फिल्ममेकर शूजीत सरकार मागील काही दिवसांपासून 'सरदार उधम सिंह' या आगामी हिंदी चित्रपटामुळं चर्चेत आहेत. २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात विकी कौशल शीर्षक म्हणजेच उधम सिंग यांच्या भूमिकेत दिसणार असून, लंडनमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरूही करण्यात आलं आहे. अशातच सरकार यांच्या आणखी एका आगामी चित्रपटाबाबत बातमी आली आहे. 'सरदार उधम सिंह' या ऐतिहासिक चित्रपटासोबतच सरकार सध्या कॅामेडी चित्रपटावरही काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.


प्रथमच एकत्र

'गुलाबो सिताबो' असं काहीसं अनोखं असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. या कॅामेडी चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन आणि आयुष्यमान खुराना प्रथमच एकत्र येणार आहेत. सरकार यांच्या दिग्दर्शनाची जादू यापूर्वी सर्वांनीच अनुभवली आहे. यापूर्वी सरकार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'शोबाईट', 'पिकू' आणि 'पिंक' या चित्रपटांमधील अमिताभ यांच्या भूमिका कौतुकास्पद ठरल्या आहेत. याखेरीज सरकार यांनी आयुष्यमानसोबतही काम केलं आहे. २०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटाद्वारे सरकार यांनीच आयुष्यमानला मोठ्या पडद्यावर लाँच केलं होतं.


पुढील महिन्यात शूटिंग

आता 'गुलाबो सिताबो'च्या माध्यमातून सरकार यांनी अमिताभ आणि आयुष्यमान या दोन दिग्गज कलावंतांना प्रथमच एकत्र आणण्याची किमया साधली आहे. गत वर्षी प्रदर्शित झालेला सरकार यांचा 'आॅक्टोबर' हा चित्रपट बॅाक्स आॅफिसवर कमाल करू शकला नव्हता. त्यामुळं 'सरदार उधम सिंग' आणि 'गुलाबो सिताबो' या चित्रपटांकडून खूप अपेक्षा आहेत. 'गुलाबो सिताबो' या चित्रपटाचं लेखन जुही चतुर्वेदी यांनी केलं आहे. पुढल्या महिन्यात या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अमिताभ आणि आयुष्यमान यांच्या तारखा जुळल्या आणि सर्व कामं योजनेप्रमाणे पार पडली, तर हा चित्रपट यंदा नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

तापसीच्या ‘गेम ओव्हर’चं रक्तरंजीत पोस्टर

हा अभिनेता अक्षयसमोर बनला खलनायक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा