हा अभिनेता अक्षयसमोर बनला खलनायक

२०१७ मध्ये रोहितनं जेव्हा सत्यकथेवर आधारित 'थीरन' या अॅक्शन-थ्रीलरपटातील अभिमन्यूचा अभिनय पाहिला, तेव्हाच 'सूर्यवंशी'साठी त्याची निवड करण्याचा विचार मनात आला. त्यातील अभिमन्यूची भूमिका रोहितला भावली आणि त्याला 'सूर्यवंशी'चा खलनायक गवसला.

  • हा अभिनेता अक्षयसमोर बनला खलनायक
SHARE

मागील काही वर्षांपासून देशभक्तीपर चित्रपटांमध्ये बिझी असलेला अभिनेता अक्षयकुमार आता 'सूर्यवंशी' या मसालापटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासमोर एक असा अभिनेता खलनायकाच्या रूपात दिसणार आहे, ज्यानं आजवर नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.


दुग्धशर्करा योग

'सूर्यवंशी'च्या निमित्तानं अक्षय प्रथमच रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार आहे. 'सिंघम', 'सिंघम रिटर्न' आणि 'सिंबा' या कॅाप सिरीजमधला 'सू्र्यवंशी' हा चौथा भाग आहे. रणवीर सिंगच्या 'सिंबा'मध्येच अक्षयच्या 'सूर्यवंशी'ची झलक पाहायला मिळाली होती. त्यामुळं 'सिंबा' पाहिल्यापासूनच अक्षयच्या चाहत्यांना 'सूर्यवंशी'बाबत उत्सुकता लागली होती. अशातच 'सूर्यवंशी'मध्ये अक्षयची नायिका कतरीना कैफ बनल्यानं दोघांच्या चाहत्यांसाठी दुग्धशर्करा योग जुळून आला, पण या चित्रपटात खलनायक कोण साकारणार ते मात्र गुपित ठेवण्यात आलं होतं.


अभिमन्यू सिंग खलनायक

आता हे गुपित उघड झालं आहे. या चित्रपटात अक्षय एटीएस चीफच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. या अॅक्शन-कॅामेडी चित्रपटात अभिमन्यू सिंग मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आहे. 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'जन्नत', 'वन्स अपॅान टाइम इन मुंबई दोबारा', 'मॅाम' या आणि अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये यापूर्वी अभिमन्यूनं साकारलेल्या व्यक्तिरेखांचं कौतुक करण्यात आलं आहे. आता तो खलनायकाच्या रूपात अक्षयसमोर कडवं आव्हान उभं करणार आहे.

 

अभिमन्यूची भूमिका भावली 

२०१७ मध्ये रोहितनं जेव्हा सत्यकथेवर आधारित 'थीरन' या अॅक्शन-थ्रीलरपटातील अभिमन्यूचा अभिनय पाहिला, तेव्हाच 'सूर्यवंशी'साठी त्याची निवड करण्याचा विचार मनात आला. त्यातील अभिमन्यूची भूमिका रोहितला भावली आणि त्याला 'सूर्यवंशी'चा खलनायक गवसला. एक दिवस अचानक रोहितनं अभिमन्यूला बोलावलं आणि 'सूर्यवंशी'मध्ये खलनायक साकारण्यासाठी निवड झाल्याची गुड न्यूज दिली. अक्षय आणि अभिमन्यू यांच्यावर या चित्रपटातील एक सिरीयस सीन चित्रीतही झाल्याचं समजतं.हेही वाचा  -

दिशाची 'बटरफ्लाय कीक' पाहिली का?

दीपिका बनणार रोमी भाटीया!
संबंधित विषय
ताज्या बातम्या