• मुंबईत विराट-अनुष्काचं रिसेप्शन, दिग्गजांची उपस्थिती!
SHARE

दिल्लीनंतर मुंबईत देखील विराट शर्मा आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचं ग्रॅण्ड रिसेप्शन आहे. या रिसेप्शनला क्रिडा, बिझनेस, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील तमाम दिग्गज उपस्थित आहेत. लोअर परेलमधल्या हॉटेल सेंट रेजिसमध्ये ही पार्टी सुरू आहे.  


क्रिकेट विश्वातून देखील अनेक दिग्गजांनी रिसेप्शनला हजेरी लावली आहे. संदीप पाटील, रविंद्र जडेजा, सायना नेहवाल यांच्यासह अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. याशिवाय रिलायन्सचे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह अनेक बिझनेस टायकून्स रिसेप्शनमध्ये सहभागी आहेत. विराट आणि अनुष्कानं ११ डिसेंबरला इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्यानंतर इटलीमध्येच त्यांनी सुट्टी घालवली होती. मुंबईप्रमाणेच विरुष्कानं दिल्लीमध्येही रिसेप्शन दिलं होतं. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली होती.


संबंधित विषय
ताज्या बातम्या