Advertisement

'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित

सोमवारी झुंड चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केल्यानंतर मंगळवारी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

'झुंड नही टीम कहिए', बिग बींचा दमदार टीझर प्रदर्शित
SHARES

मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Majule) यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. झुंड (Jhund) या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाचं अतिशय दमदार असं पहिलं पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात आलं होतं


उत्कंठा वाढवणारा टिझर

टिझरच्या सुरुवातीला नऊ-दहा तरुण हातात विटा, साखळी आणि काटी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांचे चेहरे दिसत नाहीत. ते पाठमोरे आहेत. नक्कीच ही झुंड कोणाला तरी मारायला जात आहेत. या तरुणांची ही झुंड कोणावर हल्ला करायला निघाली आहे हे मात्र कळू शकलं नाही. चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका आहे. चित्रपटाचा टिझर अभिषेक बच्चननं देखील शेअर केला आहे



बिग बी मुख्य भूमिकेत

गुरुवारी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पोस्टवर नागराज पोपटराव मंजुळे असं नाव लिहण्यात आलं आहे. ज्याच्या मध्यभागी अमिताभ बच्चन हे पाठमोरे उभे असल्याचं दिसत आहे. बिग बींनी चित्रपटात पोस्टर शेअर केला होता. यासोबतच लिहलं होतं की, "झुंड, मी स्वत: या क्षणाची प्रचंड वाट पाहत होतो. अखेर टीझर उद्या येतोय.” विशेष म्हणजे या चित्रपटाशी ही दोन तगडी नावे जोडल्यामुळे आता प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असणार यात वाद नाही.


कुणावर चित्रपट आधारीत

बिग बी हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आल्यानुसार एका झोपडपट्टीवजा वस्तीजवळील मैदानात उभे दिसत आहेत. तिथेच एक फुटबॉलही दिसत आहे. विजय बारसे यांच्या जीवनावर नागराज मंजुळेच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘झुंड’ हा प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘स्लम सॉकर’ची सुरुवात ज्यांनी केली होती.


अमिताभ साकारणार 'ही' भूमिका

चित्रपटामध्ये एका फुटबॉल प्रशिक्षकांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन दिसणार आहेत. रस्त्यावरील मुलांमध्ये फुटबॉल या खेळाप्रतीची ज्यांनी ओढ निर्माण केली. नागराज मंजुळे या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच बिग बींसोबत काम करत आहे. नागराज मंजुळे ‘झुंड’च्या निमित्तानं हिंदी कलाविश्वातही पदार्पण करत आहे.


गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी येत होत्या. शूटिंगसाठी सुरुवातीला पुण्यात सेट तयार करण्यात आला होता. पण काही कारणास्तव चित्रीकरण थांबवावं लागलं. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा होती. निर्मात्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर बिग बींनी होकार कळवला. या सर्व अडचणींनंतर अखेर ‘झुंड’चं शूटिंग नागपूरमध्ये सुरळीत पार पडलं.



हेही वाचा

'लव आज कल २'चा ट्रेलर प्रदर्शित, कार्तिक-साराची सिझलिंग केमिस्ट्री

'तान्हाजी'नं पार केला १०० कोटींचा डोंगर, आतापर्यंत केली 'इतकी' कमाई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा