Advertisement

'या' कारणामुळे कंगनाची बहिण रंगोलीचं ट्विटर अकाऊंट झालं बंद

नुकत्याच एका वादग्रस्त ट्वीटनंतर रंगोली चंडेलचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

'या' कारणामुळे कंगनाची बहिण रंगोलीचं ट्विटर अकाऊंट झालं बंद
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची बहीण रंगोली चंडेल सोशल मीडियावर चांगलीचट सक्रिय आहे. रंगोलीनं तिच्या ट्वीटरवरुन वेगवेगळ्या मुद्यांवर आपलं पडखड मत व्यक्त केलं आहे. अनेकदा कंगनाची बाजू घेण्याच्या नादात म्हणा किंवा आपलं मत दुसऱ्यांना पटवून देण्यासाठी तिनं आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकरांशी पंगा घेतला आहे. पण नुकत्याच एका वादग्रस्त ट्वीटनंतर रंगोली चंडेलचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे.

रंगोली चंडेलला तिचं अकाउंट सस्पेंड करण्याआधी अशा प्रकारे वादग्रस्त ट्वीट न करण्याविषयी ताकीद देण्यात आली होती. मात्र एवढं होऊनही रंगोली ट्वीट करत राहिली त्यामुळे ट्विटरनं तिच्यावर कारवाई करत तिचं अकाउंट सस्पेंड केलं आहे. रंगोलीला वादग्रस्त ट्वीट न करण्याबाबत ताकीद दिल्याबद्दल तिनं स्वतःच ट्वीट करुन सांगितलं होतं.

काही दिवसांपूर्वी डॉक्टर आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबाबत रंगोलीनं एक ट्वीट केलं होतं. तिनं लिहिलं होतं, एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जेव्हा पोलीस आणि डॉक्टर त्याच्या कुटुंबाला तपासण्यासाठी गेले तर त्यांनी पोलीस आणि डॉक्टरांवर हल्ला केला. धर्मनिरपेक्ष मीडिया आणि मुल्ला यांना एका रांगेत उभं करुन गोळ्या घालायला हव्या. यामुळे आपल्याला भविष्यात नाझी म्हटलं जाईल पण त्याची पर्वा नाही. आयुष्यात फेक इमेज बनवण्यापेक्षा तर हे चांगलं आहे.

रंगोली चंडेलच्या या ट्वीटनंतर हृतिक रोशनच्या एक्स वाईफची बहीण फराह खाननं तिचं अकाउंट रिपोर्ट केलं होतं. रंगोली चंडेलवर कारवाई झाल्यानंतर फराहनं ट्वीट करून ट्विटर आणि ट्विटर इंडियाचे आभार मानले आहेत. तिनं लिहिलं, मी याबाबत तक्रार केली कारण ती मागच्या काही काळापासून सतत एकाच समुदायाच्या लोकांना टार्गेट करत होती. एवढंच नाही तर तिनं मीडियालाही टार्गेट करत त्यांना गोळी मारण्याचं भाष्य केलं होतं आणि खुलेआम आपण नाझीवादी असल्याचं कबुल सुद्धा केलं होतं.



हेही वाचा

कोरोना रुग्णांसाठी शाहरुख घरीच नाचणार, किंग खानला प्रियंकाचीही साथ

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा