बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघंही चाहत्यांशी संवाद साधत आहेत. चाहत्यांना घरीच थांबण्याचं आवाहन करत आहेत. दोघांनी कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. आता तर कोरोनाग्रस्तांना मदत केल्यानंतर आता हे दोघे एका मोहिमेत सहभागी होणार आहेत. या मोहिमेतून मिळालेले पैसे कोरोनाबाधितांसाठी वापरले जाणार आहेत.
या मोहिमेच्या अंतर्गत प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान धम्माल डान्स परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. तुम्ही घर बसल्या त्यांच्या डांसचा आनंद घेऊ शकता. यासाठी फक्त तुम्हाला एका कॉन्सर्टमध्ये सहभागी व्हावं लागेल. त्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तर घर बसल्या तुम्ही या कॉन्सर्टमध्ये सहभागी होऊ शकता.
अमेरिकन पॉप सिंगर लेडी गागानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक ऑनलाइन कॉन्सर्ट 'वन वर्ल्ड : टुगेदर अॅट होम'ची घोषणा केली आहे. ज्यात हॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी होत आहेत. तर बॉलिवूडमधून शाहरुख खान आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा हे दोघं सहभागी होणार आहेत. ही ऑनलाइन कॉन्सर्ट या विकेंडला होणार असल्यानं चाहत्यांना शाहरुख खानचा डान्स परफॉर्मन्स घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
लेडी गागाच्या या कॉन्सर्टमधून मिळणारे सर्व पैसे हे कोरोना पीडितांच्या मदतसाठी आणि या व्हायरसशी लढण्यासाठी WHO ला दिला जाणार आहे. या कॉन्सर्टमधून फंड गोळा केला जाईल. ज्यातून जगभरातल्या गरजूंना मदत केली जाणार आहे. लेडी गागा, प्रियांका चोप्रा आणि शाहरुख खान यांच्यासोबत क्रिस मार्टिन, अॅड्डी वेडर, अॅल्टन जॉन, जॉन लीजेंड, लीजो, जे बाल्विन, स्टीवी वंडर, बिली जो आर्मस्ट्रांग, अँड्रिया बॉसेली, कीथ अर्बन हे कलाकार परफॉर्मन्स देणार आहेत. तर प्रसिद्ध टॉक शो होस्ट जिमी फॉलन, जिमी किमेल आणि स्टीफन कोलबर्टबिल हे हा शो होस्ट करणार आहेत.
कॉन्सर्टचं प्रसारण १८ एप्रिलला अमेरिकेतील टीव्ही नेटवर्क ABC, CBC आणि NBC यावर होणार आहे. याशिवाय या कॉन्सर्टचं प्रसारण ऑनलाइन सुद्धा होणार आहे. कोरोना व्हायरसच्या या लढाईमध्ये शाहरुखनं भारत सरकारला आर्थिक मदत तर केलीच आहे. पण यासोबतच शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खाननं त्यांचं खासगी ऑफिससुद्धा BMC च्या मदतीसाठी ओपन केलं आहे. तर प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसनं पीएम केअर्स फंड, यूनिसेफ, फीडिंग अमेरिका यासारख्या अनेक संस्थांना दान केलं आहे.
हेही वाचा