Advertisement

सोनी टीव्हीवर लवकरच कपिल शर्माची 'फिरंगी नाइट्स'


सोनी टीव्हीवर लवकरच कपिल शर्माची 'फिरंगी नाइट्स'
SHARES

कॉमेडीयन कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कपिल शर्मा लवकरच छोट्या पडद्यावर परतणार आहे. 'द कपिल शर्मा' शो बंद झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांची निराशा झाली होती. पुन्हा एकदा कपिलचा शो सुरू व्हावा अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. अखेर त्याच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण कपिल सोनी टीव्हीवर पुन्हा परतोय. नुकताच त्यानं इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. सोनी टीव्हीवरील 'फिरंगी नाइट्स' हा शो बघायला विसरू नका, असं कॅप्शनही त्यानं फोटोला दिलं आहे.





कपिल सध्या 'फिरंगी' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'फिरंगी' चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरात सुरू आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो सोनी टीव्हीवर 'फिरंगी नाइट्स' हा कार्यक्रम घेऊन येतोय. द कपिल शर्मा शोसारखीच या कार्यक्रमाची रचना असणार आहे. नवज्योत सिंग सिंधू, कीकू शारदा आणि चंदन प्रभाकर सहभाग घेतील.





'फिरंगी' चित्रपटातील कलाकार देखील पाहुणे म्हणून यात सहभागी होतील. 'फिरंगी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा एडवर्ड सोनेनब्लिक देखील कपिलच्या शोमध्ये सहभागी दिसणार आहे. कपिलच्या सांगण्यावरूनच एडवर्डनं स्टँडअप कॉमेडी करून दाखवली. एडवर्डचे मजेदार किस्से ऐकून सेटवर एकच हशा पिकला.

"मी आजपर्यंत ऐतिहासिक चित्रपटात काम केले असून त्यातल्या माझ्या भूमिका गंभीर असायच्या. पण मी पहिल्यांदाच एका कॉमेडी चित्रपटात काम केले आहे. स्टँडअप कॉमेडी करायला मला नेहमीच आवडतं. या वेळी तर कॉमेडीचा किंग कपिलसोबत काम करायला मिळाल्याचा मला आनंद आहे. फिरंगीच्या सेटवर आम्ही एकत्र वेळ घालवला. त्याच्यासोबत काम करायला खूप मजा आली," अशा भावना एडवर्डनं व्यक्त केल्या. 



हेही वाचा

सलमान-कतरिना करत आहेत 'स्वॅग से स्वागत'!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा