Advertisement

सलमान-कतरिना करत आहेत 'स्वॅग से स्वागत'!


सलमान-कतरिना करत आहेत 'स्वॅग से स्वागत'!
SHARES

सलमान खान आणि कतरिना कैफचा आगामी सिनेमा 'टायगर जिंदा है'चं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. 'स्वॅग से स्वागत' असे या गाण्याचे बोल आहेत. गाणं प्रदर्शित होण्याआधीच त्याची जोरदार चर्चा सुरू होती. सलमानचे चाहते तर या गाण्याची बरीच वाट पाहत होते. अखेर सलमानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. 




गाण्याच्या सुरुवातीपासून हुडी घातलेला सलमान पाहायला मिळतो. या संपूर्ण गाण्यात कतरिना आणि सलमान स्वॅग मूडमध्ये दिसत आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा कतरिना आणि सलमान ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

'एक था टायगर' या चिक्षपटाचं कथानक जिथे थांबलं होतं, तिथूनच 'टायगर जिंदा है'च्या कथानकाला सुरुवात होईल. चित्रपटात सलमान खान भारतीय हेराची भूमिका तर कतरिना पाकिस्तानी हेराची भूमिका करताना दिसेल.

'टायगर जिंदा है' चित्रपटात प्रेक्षकांना दमदार अॅक्शनचा अनुभव घेता येणार आहे. चित्रपटामध्ये अनेक साहसी दृश्य आहेत. या चित्रपटातील काही साहसी दृश्य स्वत: सलमान खान आणि कतरिना कॅफ यांनी केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. यश राज बॅनरखाली हा चित्रपट 22 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा

पंतप्रधानांना चिमुकला म्हणतोय, 'मेरी अर्जी सुनलो जरा'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा