Advertisement

पंतप्रधानांना चिमुकला म्हणतोय, 'मेरी अर्जी सुनलो जरा'


पंतप्रधानांना चिमुकला म्हणतोय, 'मेरी अर्जी सुनलो जरा'
SHARES

अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटानंतर आता राकेश ओमप्रकाश मेहरा याच विषयावर आधारित आणखीन एक चित्रपट घेऊन येत आहेत. 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' असं या चित्रपटाचं नाव आहे. याचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला.



मेहरा यांनी ट्वीटरवर पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये एक लहान मुलगा आणि एक महिला दिसत आहे. दोघे एका भिंतीजवळ उभे आहेत. त्या भिंतीवर शौचालयाचे चित्र काढलेले आहे.



मुंबईतल्या स्लम भागात राहणाऱ्या चार मुलांच्या आयुष्यावर चित्रपटाची कथा आधारित आहे. चार मुलांपैकी एका मुलाला आपल्या आईसाठी टॉयलेट बांधायचे असते. त्यासाठी तो पंतप्रधानांंना विनंती करत असतो. अशी या चित्रपटाची कथा असणार आहे. या चित्रपटात सय्यामी खेर ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सय्यामी खेरनं राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.  



घाटकोपरच्या स्लम भागात या चित्रपटाचे काही सिन शूट करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेहरा यांनी या परिसरात टॉयलेट उभारण्यासाठी देखील हातभार लावला आहे. ज्या ठिकाणी चित्रपटाचे शूटिंग झालं तिकडेच मेहरा यांनी टॉयलेट उभारण्यासाठी आर्थिक मदत केली.



हेही वाचा

'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर रिलीज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा