Advertisement

'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर रिलीज


'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटाचा फर्स्ट पोस्टर रिलीज
SHARES

'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटाच्या सिक्वलचा फर्स्ट लूक लाँच झाला आहे. करण जोहरनं सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरवर अभिनेता टायगर श्रॉफ पाहायला मिळत आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर २'च्या या पोस्टरवर अॅडमिशन्स ओपन असं देखील लिहिण्यात आलं आहे.

टायगर श्रॉफनं चित्रपटाचं पोस्टर ट्वीटरवर शेअर केलं आहे. 'एवढ्या चांगल्या स्कूलमध्ये अॅडमिशन दिल्याबद्दल करण जोहर सर आणि पुनित मल्होत्रा सर यांचा मी आभारी आहे,' अशी कॅप्शनही टायगरनं पोस्टरला दिली आहे.

पोस्टरवर चित्रपटातील इतर कोणतेच कलाकार दिसत नाहीत. याशिवाय अशी देखील चर्चा आहे की, या चित्रपटातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटानीच्या नावाची देखील चर्चा आहे. पण नक्की कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे, याबद्दल कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनित मल्होत्रा करणार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होईल.

२൦१२ मध्ये प्रदर्शित झालेला 'स्टुडंट ऑफ द इयर'नं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात आलिया भट, वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या तिघांनी आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.



हेही वाचा

'बिग बॉस'मधील भारदस्त आवाज कुणाचा माहिती आहे?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा