Advertisement

'बिग बॉस'मधील भारदस्त आवाज कुणाचा माहिती आहे?


'बिग बॉस'मधील भारदस्त आवाज कुणाचा माहिती आहे?
SHARES

'बिग बॉस चाहते है', हा दमदार आवाज घराघरात पोहोचवणारा अवलिया नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बिग बॉसमध्ये ऐकू येणाऱ्या या आवाजानं 'बिग बॉस'शोची लोकप्रियता वाढवली, यात काही शंका नाही. आता बिग बॉसचं ११ वं पर्व सुरू आहे. यापूर्वी बिग बॉसचे १൦ पर्व आले आणि प्रचंड गाजले. पण बिग बॉसमध्ये सर्वांना आदेश देणारा हा आवाज नक्की कुणाचा? हे कोडे काही सुटत नव्हते. पण अखेर हे कोडे सुटले आहे.


बिग बॉसच्या घरातच अतुल कपूर याची रूम!

'बिग बॉस'च्या भारदस्त आवाजामागे असणारी व्यक्ती म्हणजे व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट अतुल कपूर आहेत. घरातल्या सदस्यांना आदेश देणारा, रागवणारा कधी त्यांची समजूत काढणारा आवाज म्हणजे अतुल कपूर यांचा आहे. बिग बॉसच्या पहिल्या पर्वापासून अतुल या शोला आवाज देत आहेत. बिग बॉस या शोमध्ये ३ महिने सेलिब्रिटी स्पर्धकांना एकाच घरात बंद केले जाते. स्पर्धकांच्या प्रत्येक हालचालीवर अतुल कपूर यांची करडी नजर असते. शोवेळी ते संपूर्ण वेळ बिग बॉसच्या घरातच असतात. अतुल यांना एक स्वतंत्र रूम देण्यात आली आहे. प्रत्यक्षात बिग बॉस कोण आहे? कसा दिसतो? याची कोणालाच माहिती नव्हती. तरी प्रत्येक जण या आवाजाच्या प्रेमात आहे.  

अतुल यांच्याबद्दलची माहिती बिग बॉसमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तर नाहीच, शिवाय प्रेक्षकांनाही नव्हती. पण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे बिग बॉसच्या आवाजामागे असणारा अवलिया समोर आला आहे.

अतुल कपूर यांचा जन्म २८ डिसेंबर १९६६ मध्ये झाला. २൦൦२ पासून त्यांनी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली. अतुल यांच्या आवाजानं अनेकांची मनं जिंकली. त्यामुळे इंडस्ट्रीत त्यांना प्रचंड यश मिळालं. फक्त हिंदीच नाही, तर हॉलिवूड चित्रपटांना देखील त्यांनी आपला आवाज दिला आहे. आयर्न मॅन, अॅवेंजर, कॅप्टन अमेरिका यांसारख्या अनेक चित्रपटांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.



हेही वाचा

अखेर ‘पद्मावती’ची रिलीज डेट पुढे ढकलली

'अशी' आहे मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा