Advertisement

रणवीर-आलिया ही जोडी पुन्हा एकत्र, करण जोहरच्या नव्या चित्रपटाची घोषणा

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल पाच वर्षानंतर दिग्दर्शनाकडे वळला आहे.

रणवीर-आलिया ही जोडी पुन्हा एकत्र, करण जोहरच्या नव्या चित्रपटाची घोषणा
SHARES

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर तब्बल पाच वर्षानंतर दिग्दर्शनाकडे वळला आहे. दिग्दर्शक म्हणून करणनं त्याच्या आगामी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाचं नाव 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' असं आहे.

या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचं लेखन इशिता मोईत्रा, शशांक खेतान आणि सुमित रॉय यांनी केलं आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होईल. सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा करताना करणनं लिहिलं की, 'मी माझ्या पसंतीच्या लोकांसह कॅमेर्‍याच्या मागे काम करण्यास खूप उत्साही आहे.'

यापूर्वी ५ जुलै रोजी करणनं आपल्या चित्रपटांच्या क्लिप्सचा एक व्हिडिओ शेअर करताना दिग्दर्शक म्हणून त्याचा प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला होता. पाच वर्षांनी तो पुन्हा एकदादिग्दर्शनाकडे वळणार असल्याचं त्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं. करणनं लिहिलं होतं की, "नव्या प्रवासाची ही सुरुवात आहे, आपल्या आवडत्या जागी परत जाण्याची वेळ आली आहे, कॅमे-याच्या मागे जाऊन काही संस्मरणीय प्रेमकथा तयार करण्याची वेळ आली आहे."

 १९९८ मध्ये 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर त्यानं 'कभी खुशी कभी गम', 'कभीअलविदा ना कहना', 'माय नेम इज खान', 'स्टुडंट ऑफ द इयर' यासारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

दिग्दर्शक म्हणून त्याचा शेवटचा चित्रपट 'ऐ दिल है मुश्किल' हा होता. हा चित्रपट २०१६ मध्ये रिलीज झाला होता. याशिवाय करणनं 'बॉम्बे टॉकीज', 'लस्ट स्टोरीज' आणि 'घोस्ट स्टोरीज' यासारख्या काही निवडक सेग्मेंट्स दिग्दर्शित केले होते. निर्माता म्हणून त्यानं 'सूर्यवंशी', 'ब्रह्मास्त्र', 'दोस्ताना 2', 'मीनाक्षी सुंदरेश्वर' या चित्रपटांमध्ये पैसे गुंतवले आहेत.



हेही वाचा

शगुफ्ता अली गेल्या 4 वर्षांपासून बेरोजगार, चाहत्यांकडे मागितली मदत

'दृश्यम'नंतर मोहनलाल यांच्या नव्या थ्रिलरची घोषणा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा