Advertisement

कतरिना कैफ आणि विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती तसेच अभिनेता विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.

कतरिना कैफ आणि विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
SHARES

अभिनेत्री कतरिना कैफ आणि तिचा पती तसेच अभिनेता विकी कौशलला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये गुन्ह्याची नोंद करून घेण्यात आल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

तर अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना सोशल मीडियाद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका स्ट्रगलिंग अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनविंदर सिंग असे या अभिनेत्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे. तो मुंबईत चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी धडपडत होता. तसंच तो कतरिना कैफचा चाहता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाकारांना इंस्टाग्रामवर धमक्या येत होत्या आणि आरोपी कतरिना कैफचा पाठलाग करून तिला धमक्याही देत होता. तसंच सिंग गेल्या तीन महिन्यांपासून मुंबईच्या उपनगरातील सांताक्रूझमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अभिनयात करिअर करण्यासाठी तो लखनौहून मुंबईत आला होता. त्यांनी 12वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून तो कतरीनाला स्टॉक करत होता. तसंच अलीकडेच तो कतरीनाच्या घराजवळील एका लॉजमध्ये शिफ्ट झाला. तक्रारीच्या आधारे, सांताक्रूझ पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 506-II (गुन्हेगारी धमकावणे) आणि 354-डी (पीछे मारणे) अंतर्गत त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

कैफचा पती विकी कौशल याने आज सकाळी सिंहविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आरोपी कैफला सोशल मीडियावर ट्रोल करत होता. अवघ्या पाच तासांत पोलिसांनी सिंगला मालाड येथून अटक केली. त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

कतरिना आणि विकी हे नुकतेच मालदीवला सुट्ट्यांसाठी गेले होते. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त जवळच्या मित्रपरिवारासोबत हे दोघे मालदीवला गेलेले. त्यांनी या दौऱ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले होते.

काही आठवड्यांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला प्रमाणे तुम्हालाही मारुन टाकू अशी धमकी सलमान आणि त्याच्या वडिलांना एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आली होती.

यानंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय. तपासानुसार बिश्नोई टोळीकडू बॉलिवूड कलाकारांकडून खंडीणी गोळा करण्याच्या उद्देशाने या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारीच सलामनने नव्याने नियुक्त करण्यात आलेले मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची त्यांच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात जाऊन भेट घेतली. सलमानने शस्त्र बाळण्यासंदर्भातील परवाना देण्याची विनंती पोलीस खात्याकडे केल्याचे समजते.हेही वाचा

रणवीर सिंह विरोधात चेंबुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा