Advertisement

केके यांचे पार्थिव आज मुंबईत येणार, 2 जूनला अंत्यसंस्कार

KK यांच्यावर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कधी आणि कुठे? जाणून घ्या सर्व माहिती...

केके यांचे पार्थिव आज मुंबईत येणार, 2 जूनला अंत्यसंस्कार
SHARES

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके(singer KK) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केके यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सीएमआरआय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. केके यांचे पार्थिव बुधवार रात्री 9 पर्यंत मुंबईत( Mumbai)आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी बॉलीवूडमधील कलाकार, गायक उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोलकत्यातील रवींद्र सदनात सलामीसाठी त्याचे पार्थिव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होत्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत सहवदेना व्यक्त केल्या आहेत. केके यांच्या शवविच्छेदन झाल्यनंतर त्याच्या पार्थिवाला तोफांची सलामी देण्यात आली.

केके यांच्यावर मुंबईतील, वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायंकाळी कोलकाता येथून पार्थिव मुंबईसाठी रवाना होईल. कोलकाताहून सायंकाळी 5.15 ची फ्लाइट आहे. साधारण रात्री नऊ वाजेपर्यंत ते मुंबईत पोहोचतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, कोलकातामध्ये गायक केकेचा धक्कादायक मृत्यू झाल्याच्या काही तासांनंतरच सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये त्याला लाईव्ह शोमधून बाहेर घेऊन जात आहेत. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तो अस्वस्थ आहे हे दिसून येतंय.

लाईव्ह शोमधून केके यांना हॉटेलमध्ये घेऊन जात होते. हॉटेल रुममध्ये त्याला जास्त त्रास जाणवू लागला.  छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. पण रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.

दुसर्‍या व्हिडिओमध्ये केके यांचा चेहरा पुसण्यासाठी ब्रेक घेतला. केके यांना भरपूर घाम येत असल्याचे दिसून आले. केके यांनी "बोहोत झ्यादा गरम है" असे देखील म्हणाले. एका क्षणी, केके स्टेजवर असलेल्या एका माणसाला हातवारे करताना दिसला आणि एअर कंडिशनिंगबद्दल बोलताना दिसला.हेही वाचा

मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

गायक केके यांचे निधनापूर्वीचे धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांचे आरोप...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा