Advertisement

कोंकणाचा 'अ मॅान्सून डेट'

राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं नेहमीच प्रवापेक्षा वेगळ्या धाटणीच्या भूमिकांच्या बळावर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. लवकरच प्रेक्षकांना कोंकणाचा 'अ मॅान्सून डेट' हा लघुपट पहायला मिळणार आहे.

कोंकणाचा 'अ मॅान्सून डेट'
SHARES

राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री कोंकणा सेन शर्मानं नेहमीच प्रवापेक्षा वेगळ्या धाटणीच्या भूमिकांच्या बळावर प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. लवकरच प्रेक्षकांना कोंकणाचा 'अ मॅान्सून डेट' हा लघुपट पहायला मिळणार आहे.


बालकलाकार म्हणून करियर सुरू

१९८३ मध्ये 'इंदिरा' या बंगाली चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून आपलं करियर सुरू करणाऱ्या कोंकणानं 'मि. अँड मिसेस. अय्यर' या चित्रपटासाठी नॅशनल अॅवॅार्ड पटकावला आहे. त्यानंतर बंगाली, इंग्रजी आणि हिंदी चित्रपटांमध्ये करियर घडवणाऱ्या कोंकणानं गत वर्षी प्रदर्शित झालेल्या 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या बहुचर्चित चित्रपटातील शीरीन असलम या व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा क्रिटिक्स स्क्रीन अॅर्वार्ड आपल्या नावे केला आहे. आजवरच्या करियरमध्ये बऱ्याच पुरस्कारांवर आपलं नाव कोरणारी कोंकणा आता 'अ मॅान्सून डेट' या लघुपटात झळकणार आहे.


५ जून रोजी प्रदर्शित 

'अ मॅान्सून डेट' हा लघुपट ५ जून रोजी इरॅास नाऊवर प्रदर्शित होणार आहे. हिंदी भाषेत बनलेल्या या लघुपटाचं दिग्दर्शन आजवर बऱ्याच यशस्वी चित्रपटांचं लेखन-दिग्दर्शन करणाऱ्या तनुजा चंद्रा यांनी केलं आहे. शीर्षकावरून हा लघुपट पावसातील एका दिवसाची कथा सांगणारा असल्याचं जाणवतं. कोंकणानं या लघुपटात एका तरुण स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली आहे. तिच्या जोडीला प्रियांशू पैनियुली, चित्तरंजन त्रिपाठी, प्रसाद रेड्डी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या लघुपटाचं छायांकन सौरभ गोस्वामी यांनी केलं असून, संकलन अक्षरा प्रभाकर यांनी केलं आहे.


हिंदी चित्रपटांमध्ये बिझी 

मागच्या वर्षी रितूपर्णो घोष यांच्या 'बर्ड आॅफ डस्क' या इंग्रजी-बंगाली भाषेतील माहितीपटात रियल लाईफ कॅरेक्टरमध्ये दिसलेली कोंकणा सध्या हिंदी चित्रपटांमध्ये बिझी आहे. यापैकी दिग्दर्शिका सीमा पाहवा यांचा 'पिंड दान' या वेगळ्या विषयावरील चित्रपटाचं सध्या प्री-प्रोडक्शन सुरू आहे. याखेरीज 'स्कॅालरशीप' आणि 'डॅाली, किट्टू और वो चमकते सितारे' या हिंदी चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. 'डॅाली, किट्टू और वो चमकते सितारे' या चित्रपटात ती डॅाली बनली आहे. 'कार्गो' या चित्रपटात कोंकणा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल, पण तूर्तास तरी तिच्या चाहत्यांना 'अ मॅान्सून डेट'चे वेध लागले आहेत.



हेही वाचा-

ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन

अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्स



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा